साप्ताहिक राशिभविष्य : (१८ ऑगस्ट २०२४ ते २४ ऑगस्ट २०२४)
नोकरीच्या संधी येतील
मेष : पौर्णिमेचा सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना प्रेरणा देणाराच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक पातळीवर यश मिळेल. नोकरीच्या उत्तम संधी येतील. सप्ताहाची सुरुवात जीवनात मार्ग निश्चिती करणारी ठरेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनातून मोठे लाभ होतील. ता. २० व २१ हे दिवस थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून यश साध्य करणारे ठरतील.
महत्त्वाची कामं होतील
वृषभ : पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांतून फलदायी होणारे. पती वा पत्नीची ग्रासलेली चिंता जाईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच चैन व करमणुकीचा राहील. पर्यटनांतून आनंद मिळेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट स्वागत सत्कारातून प्रसन्न ठेवेल. मात्र प्रिय व्यक्तीशी गैरसमज टाळा.
भागीदारीत समस्या उद्भवतील
मिथुन : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातील ग्रहमान संमिश्र स्वरूपाची फळे देईल. भागीदारीचे काही प्रश्न उद्भवतील. बाकी पौर्णिमा मृग नक्षत्राच्या व्यक्तींना बौद्धिक उपक्रमांतून प्रसिद्धी देईल. नोकरीतील घडामोडींतून भाग्य संकेत मिळतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सुवार्तातून फ्लॅश न्यूजमध्ये आणेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मनपसंत गाठीभेटींचा, प्रेमिकांचे स्वर जुळतील.
आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कर्क : सप्ताहात व्यावसायिक तेजी राहीलच. मात्र सप्ताहात संशयास्पद, आर्थिक व्यवहार टाळा, शेअर बाजारात अतिरेक नको. बाकी आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून मोठे यश. एखादा भूखंड सोडवून घ्याल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ एखादी आरोग्य चिंता सतावेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा वस्तू हरवण्याची ठरू शकते.
वास्तुविषयक प्रश्न मार्गी लागतील
सिंह : राशीतील बुध-शुक्र पौर्णिमेजवळ प्रभावी ठरतील. व्यावसायिक क्षितिजं रुंदावतील. नोकरीतील महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे भाग्यसंकेत मिळतील. विभागांतर्गत स्पर्धा परीक्षांमधून यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक प्रश्न मार्गी लागतील. एकूणच सप्ताहाचा शेवट आपल्या राशीस सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. विशिष्ट सहली करमणुकीचा योग आहे.
नोकरीतल्या चिंता जातील
कन्या : सप्ताह संमिश्र पार्श्वभूमीवर बोलेल. सप्ताहात स्त्री वर्गाने आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपावेच. प्रेमिकांनी आणि नवपरिणितांनी निश्चित आचार संहिता पाळावी. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र जपावेच. बाकी पौर्णिमेजवळचे गुरुभ्रमण हस्त नक्षत्राच्या व्यक्तींच्या बाबतीत निखालस शुभ. नोकरीतील चिंता जाईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट दैवी प्रचितीचा. सहकुटुंब तीर्थाटने होतील.
नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील
तूळ : पौर्णिमेचं फिल्ड बुध-शुक्रांच्या भ्रमणांच्या पार्श्वभूमीवर होतकरू तरुणांना छानच वाटतं, मात्र अवास्तव कल्पनामध्ये रमू नका. प्रेमप्रकरणात अडकू नका. सप्ताहात नोकरीच्या उत्तम संधी येतील, चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती लाभ उठवतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तीसाठी सप्ताहाचा शेवट छान सुवार्ताचा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींवर नोकरीत वरिष्ठांची कृपा होईल.
व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील
वृश्चिक : पौर्णिमेचा सप्ताह व्यावसायिक आडाखे यशस्वी करेल. पौर्णिमेजवळ विशिष्ट राजकीय लाभ होतील. ता. २० ते २२ हे दिवस महत्त्वाच्या कामांतून सुसंगत राहतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीजन्य लाभ. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ मानसन्मानाचे योग. व्यावसायिक लॉटरी.
अपयश धुऊन निघेल
धनू : पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र स्वतंत्र व्यावसायिकांना अतिशय साथ देईल. विशिष्ट वादग्रस्त येणे वसूल होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीत प्रशंसा होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट विशिष्ट अपयश धुऊन काढणारा असेल. विवाहातील अडथळे दूर होतील. ओळखी मध्यस्थी उपयोगास येतील. गाठीभेटी यशस्वी होतील.
जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील
मकर : पौर्णिमेच्या स्पंदनातून शुभग्रहांची कनेक्टव्हिटी उत्तम राहील. सरकारी माध्यमांतून लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचे एखादे व्यावसायिक स्वरूपाचे न्यायालयीन प्रकरण मिटेल. पती वा पत्नीचा आर्थिक उत्कर्ष होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा वस्तूंच्या हरवाहरवींची असण्याची शक्यता. उत्सव समारंभात बेरंग होऊ शकतो.
वाहन व कुत्र्यांपासून काळजी घ्या
कुंभ : पौर्णिमेचा सप्ताह अतिशय संवेदनशील आणि छान प्रवाही राहील. काहींना बुद्धिकौशल्यातून लाभ होतील. काहींना पौर्णिमा प्रसिद्धी देणारी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीकडून लाभ. मात्र सप्ताहात वाहनांपासून जपा. भाजणं-कापणं सांभाळा. काहींना श्वानदंश शक्य, शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र लाभेल. पुत्रोत्कर्षातून धन्यता येईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठ्या चैनीचा असेल.
सरकारी कामं होतील
मीन : पौर्णिमेजवळ भावनिक उद्रेक टाळा. वाहतुकीत जपा. पैशाचं पाकीट सांभाळा. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा संमिश्र स्वरूपाची. घरात कामगार पीडा होईल. व्यावसायिक यंत्र पीडा होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी मोठे परिस्थितीजन्य लाभ देईल. सरकारी कामे होतील. घरातील तरुणांची कार्ये ठरतील. सूर्योदयी सुवार्ता मिळतील. प्रेमप्रकरणे मार्गी लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.