weekly horoscope 26th may 2024 to 1st june 2024
weekly horoscope 26th may 2024 to 1st june 2024Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (२६ मे २०२४ ते १ जून २०२४)

सध्याच्या संगणकीय युगात माणसाचे विचार बोटे चालवत असताना कुठं क्लिक करतील किंवा आपल्या संगणकीय मेमरीमध्ये हात घालत कुठल्या विकृतीला कवटाळतील, याचा काही नेम नाही.
Published on

वास्तूची खरेदी होईल

मेष : अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात घरगुती पार्श्‍वभमीवर उत्तम राहील. वास्तू खरेदी होईल. बँकांची कामे होतील. मंगळवार सुवार्ताचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराब राहील. नोकरीत विरोधी परिस्थिती असेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस छान रंगसंगतीचे. ओळखी-मध्यस्थीतून लाभ होतील.

व्यवसायात चांगला कालखंड

वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीस अर्थातच ता. २७ व २८ हे दिवस व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारे ठरतील. विशिष्ट वसुलीतून लाभ होईल. कृत्तिका नक्षत्रास पुत्रचिंतेतून मुक्तता मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह वैयक्तिक उपक्रमातून फलदायी होणारा असेल. ता. २८ ची पंचमी विजयोत्सवाची असेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट जुगारसदृश व्यवहारातून नुकसानीचा ठरू शकतो. चुकीच्या मित्र संगतीतून अडचणीत आणणारा काळ.

मौल्यवान चीजवस्तू जपा

मिथुन : बुध-हर्षल सहयोगाची पार्श्‍वभूमी वादग्रस्त ठरणारी तसेच खराब वातावरण करणारी. पुनर्वसु नक्षत्राच्या गर्भवतींनी सप्ताहामध्ये सांभाळावं. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज नकोत, आर्द्रा नक्षत्रास शुभग्रहांची पार्श्‍वभूमी लाभल्यानं विशिष्ट वैयक्तिक समारंभ साजरे करेल. उद्याचा सोमवार शैक्षणिक चिंता घालवेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सहल - करमणुकीचे योग, मात्र मौल्यवान चीजवस्तू जपा.

मनासारख्या घटना घडतील

कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीस शुभग्रहांचा छान ट्रॅक राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी होतील. घरातील विवाहविषयक हालचालींना वेग येईल. तरुणांचे विवाह मार्गी लागतील. पुष्य नक्षत्रांच्या व्यक्तींना ता. २७ ते २९ हे दिवस उत्तम चंद्रबळ ठेवतील. एकामागून एक मनासारख्या घटना घडतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार धनवर्षावाचा, मात्र सप्ताहाचा शेवट विचित्र स्वरूपाची गुप्तचिंता लागणारा ठरेल.

परदेशात नोकरी लागेल

सिंह : शुभग्रहांच्या ओव्हर्स धावा काढून देतील. परिस्थितीजन्य लाभ होतील. मात्र कुसंगतीपासून जपा. सरकारी नियम चोख पाळा, सिग्नल तोडू नकाच. बाकी ता. २९ व ३० हे दिवस महत्त्वाच्या कामांतून फलद्रूप होणारे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहांची सुरुवात नोकरीत भाग्यसूचक राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार वलयांकित करणारा.

व्यावसायिक वसुली होईल

कन्या : सप्ताहातील ग्रहमान शुभग्रहांच्या पार्श्‍वभूमीवर बोलेल. मात्र बुध-हर्षल सहयोग आणि मंगळभ्रमणाची पार्श्वभूमी विचित्र दुखापतींचा प्रसंग आणू शकते. गर्दीच्या ठिकाणी सांभाळा. बाकी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात घरातील सुवार्तातून प्रसन्नतेचीच. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुलीतून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैवाहिक जीवनामध्ये वादंगाचा ठरेल, काळजी घ्या.

नोकरीत राजकारणापासून दूर राहा

तूळ : सप्ताह आचारसंहिता पाळण्याचा. वेंधळेपणा टाळाच. नोकरीतील राजकारणात पडू नका. २८ ते ३० हे दिवस स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उलाढालीतून लाभ देणारे. उत्सव प्रदर्शनातून लाभ होईल. कलाकारांसाठी परदेशगमनाचा योग. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार आणि गुरुवारची अष्टमी धनवर्षावाची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उष्णताजन्य विकाराचं भय.

नोकरीत उत्तम पॅकेज लाभेल

वृश्चिक : सप्ताहात शुभग्रहांचंच फिल्ड राहील. मात्र सप्ताहात भाजण्या-कापण्यापासून सांभाळा. घरातील लहान मुलांकडं लक्ष द्या. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाचं उत्तम पॅकेज नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर अंमल करेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार आणि गुरुवार वैवाहिक जीवनात जल्लोषाचा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट आर्थिक व्यवहारांतून कायदेशीर अडचणी निर्माण करणारा.

गैरसमज-भांडणं टाळा

धनु : सप्ताहातील ग्रहमान अडखळत वाटचाल करणारे. स्त्री वर्गास आणि विशेषतः नवपरिणितांना मानवी उपद्रवातून त्रासदायक ठरणारं ग्रहमान. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज, भांडणे टाळावीतच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवन सांभाळावं. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात वाहनभय दाखवते. बाकी उद्याचा सोमवार आणि नंतर गुरुवार घरगुती सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल.

महत्त्वाच्या कामात यश

मकर : सप्ताहात नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देणारंच ग्रहमान आहे. सप्ताहारंभ उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद आदी माध्यमातून वलंयकित करणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या उत्तम संधी येतील. ता. २९ व ३० हे दिवस महत्त्वाच्या कामातून यश देणारे. घरातील तरुणांचे विवाह ठरतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विचित्र हितशत्रूपीडेचा, नातेवाईक सांभाळा. शेजारी जपा.

व्यवसायात मोठे लाभ होतील

कुंभ : सप्ताहात फिल्डवर टिकून राहा. नका मारू चौकार षटकार! संमोहनं टाळा. सप्ताहात प्रेमिकांना प्रेमरोग ग्रासू शकतो. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ देईल. स्वतंत्र व्यावसायिकांना सरकारी लाभ. वास्तुविषयक कटकटी जातील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची खरेदी-विक्रीतून फसवणूक शक्य. संगणकीय व्यवहारातून गफलत होऊ शकते. हातापायांच्या दुखापतींपासून सांभाळा.

यंत्रं-वाहनं जपून हाताळा

मीन : सप्ताहातील ग्रहयोग बेसावधतेतून मोठे प्रसंग घडवू शकतात. सप्ताहात यंत्रं-वाहनं जपून हाताळा. बाकी सप्ताह तरुणांचा परदेशात भाग्योदय करेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ होतील. सप्ताहारंभी प्रवासातील कामे होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अनेक प्रकारांतून उपद्रव देऊ शकतो. वागण्याबोलण्यातील अतिरेक टाळा. नवविवाहितांनी गैरसमज टाळावेत. अपरिचित व्यक्तींशी जपूनच वागा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com