weekly horoscope 30th june 2024 to 6th july 2024
weekly horoscope 30th june 2024 to 6th july 2024Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (३० जून २०२४ ते ६ जुलै २०२४)

रवी आणि चंद्र हे सृष्टीचा विलास पहाणारे चक्षु असल्यासारखेच आहेत. ते ज्या वेळी उघडे असतात, त्या वेळी ते आजूबाजूचं व्यक्त स्वरूपातलं विश्वरूपदर्शनच घेत असतात.
Published on

सरकारी कामं होतील

मेष : सप्ताह भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नियोजित कामांतून छान फलद्रूप होईल. ता. ३ व ४ हे दिवस थोरामोठ्यांच्या गाठीभेटीतून चमत्कार घडवतील. महत्त्वाची सरकारी कामं होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी वेंधळेपणा टाळावा. कामांचं वेळापत्रक शिस्तबद्धपणानं पाळावं. अमावस्या कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापतींची शक्यता लक्षात घेऊन काळजी घ्यावी.

मुलाखतींमध्ये यश मिळेल

वृषभ : सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-शनीच्या शुभयोगातून मोठे व्यावसायिक लाभ होतील. मोठी कर्जवसुली होईल. विशिष्ट प्रकारच्या न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ जुलैचा बुधवार अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक शुभारंभ होतील. अमावस्येजवळ मोठी चैन चंगळ मौजमजेचा योग. घरात पाहुण्यांची वर्दळ असेल.

कलाकारांना संधी मिळतील

मिथुन : सप्ताहात होणारा शुक्र-शनी यांचा शुभयोग. स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तमच राहील. मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार संपन्न होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या कलाकारांना मोठ्या संधी प्राप्त होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उत्तम प्रवासाचे योग येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रांकडून लाभ होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या दैवी प्रचितीची ठरेल.

आर्थिक संकट दूर होईल

कर्क : सप्ताहात गुरुचं पाठबळ राहील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. परदेशाचा व्हिसा मिळेल. ता. २ व ३ हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम साथसंगतीचेच राहतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. विशिष्ट वास्तुविषयक व्यवहार होतील. अमावस्या आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक संकटातून निभावून नेईल.

परदेशी नोकरीचा योग

सिंह : सप्ताहातील ग्रहयोग तरुणांना विक्रमी धावसंख्या रचून देईल. काहींच्या विवाहातील अडसर दूर होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीतील घडामोडीतून प्रगतीच्या संधी देणारा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीचा लाभ होईल. व्यावसायिकांना उत्तम सरकारी पाठबळ मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट मानसन्मानातून सुखद धक्का देणारा.

वास्तुविषयक व्यवहार होतील

कन्या : सप्ताह विलक्षण गतिमान राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक लाभ होतील. व्यावसायिक वास्तुविषयक व्यवहार होतील. सार्वजनिक जीवनातल्या गोष्टींतून यश मिळेल. विशिष्ट कोर्टप्रकरण सुटेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती ता. ३ व ४ हे दिवस विशिष्ट यशाचा झगमगाट साजरा करतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर विवाहयोग. अमावस्येजवळ प्रवासात जपावं. बाकी अमावस्या काहींना प्रसिद्धियोगाची.

नोकरीत लाभदायक कालखंड

तूळ : सप्ताहातील शुक्र-शनी शुभयोगाची पार्श्वभूमी नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ देणारी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नोकरीच्या पार्श्वभूमीवर काही शुभलक्षणं दाखवेल. वास्तुविषयक किचकट प्रश्न सुटतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून व्यावसायिकदृष्ट्या यश. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना योग्य विवाहस्थळं येतील. बुधवार यशस्वी गाठीभेटींचा ठरेल.

सहकुटुंब तीर्थाटन घडेल

वृश्चिक : सप्ताहात कर्जमुक्त व्हाल. ता. ३ ते ५ हे दिवस मोठे गतिमान राहतील. वैवाहिक जीवनात आनंद साजरा कराल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाचं पर्व सहकुटुंब तीर्थाटन घडवेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या संधी येतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येची पार्श्‍वभूमी सप्ताहाच्या शेवटी संमिश्र स्वरूपाची ठरेल. प्रवासात जपा, बाकी नोकरीतील एखादी चिंता जाईल.

परीक्षांमध्ये यश लाभेल

धनु : सप्ताहातील ग्रहांचं फिल्ड शुक्रभ्रमणातून उत्तम राखेल. सप्ताहाची सुरुवात सतत ग्रीन सिग्नल देत राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुली करून देणारा सप्ताह. तरुणांना खेळ, छंद वा विशिष्ट स्पर्धा परीक्षांतून यश देणारा सप्ताह. अमावस्येचं प्रभावक्षेत्र शुक्रभ्रमणातून प्रकाशातच आणेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या दैवी प्रचितीची. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना व्याधीवर औषध लागू पडेल.

पोटाच्या विकारांपासून जपा

मकर : सप्ताहात आरोग्यविषयक पथ्यं पाळा. बाकी सप्ताह व्यावसायिकदृष्ट्या आर्थिक ओघ ठेवेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ चा बुधवार मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. नोकरीच्या संधी येतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कर्जमंजुरीतून लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचं प्रभावक्षेत्र स्त्रीचिंतेतून नेईल. भावा-बहिणींशी वाद टाळा. पोटाचे विकार सतावतील.

मान-सन्मानाचे योग

कुंभ : सप्ताह शुक्र-शनीच्या शुभयोगातून मोठी सुंदर फळे देईल. सप्ताहाची सुरुवात व्यावसायिक मोठी प्राप्ती करून देईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती पार्श्वभूमीवर सप्ताह सुवार्ताची परंपरा राखेल. तरुणांना एखादं स्पर्धात्मक यश नोकरीत देऊन जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी मोठ्या मानसन्मानाचे योग. पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल.

नोकरीत बढतीची शक्यता

मीन : सप्ताहातील शुक्रभ्रमण आपल्या घरातील आणि बाहेरील मानसिक पर्यावरण छानच ठेवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह भावसमृद्ध करणारा ठरेल. पती किंवा पत्नीचा भाग्योदय होईल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर विवाहयोग आहेत. नोकरीत बढतीची चाहूल लागेल. अमावस्या घबाडसदृश फळं देणारी. काहींचे वास्तुविषयक व्यवहार होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.