पाहा, संक्रांतीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची मनमोहक सजावट

पाहा, संक्रांतीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची मन मोहवून टाकणारी सजावट
Vitthal-Rukmini temple
Vitthal-Rukmini templeSakal
Updated on
Summary

विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक मनमोहक सजावट केली जाते.

पंढरपूर (सोलापूर) : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात (Shri Vitthal - Rukmini Temple) तब्बल साठ प्रकारच्या फळभाज्या (Vegetables), विविध प्रकारची फुले तसेच तिळगूळ आणि 1 हजार रंगीबेरंगी पतंगांचा (Kites) वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (Adorable decoration of Vitthal-Rukmini temple with fruits and vegetables and flowers)

सुमारे दीड टन फळभाज्या आणि फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिरात आज जिकडे पाहावे तिकडे भाज्या आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळत आहेत.
सुमारे दीड टन फळभाज्या आणि फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिरात आज जिकडे पाहावे तिकडे भाज्या आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळत आहेत.Sakal
विविध प्रकारच्या भाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आल्याने संत सावता माळी (Saint Sawta Mali) यांच्या 'कांदा, मुळा, भाजी; अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे.
विविध प्रकारच्या भाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आल्याने संत सावता माळी (Saint Sawta Mali) यांच्या 'कांदा, मुळा, भाजी; अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे.Sakal
विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव (National Festivals), एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक मनमोहक सजावट केली जाते.
विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव (National Festivals), एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक मनमोहक सजावट केली जाते.Sakal
अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्‍यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात.
अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्‍यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात.Sakal
गवार, भेंडी, फ्लॉवर, मुळा, गाजर, वांगी, कोबी, बीट, दोडका आदी साठ प्रकारच्या फळभाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. तिळगुळासह झेंडू, शेवंती अशी फुले आणि रंगीबेरंगी पतंग देखील सजावटीसाठी वापरण्यात आले आहेत.
गवार, भेंडी, फ्लॉवर, मुळा, गाजर, वांगी, कोबी, बीट, दोडका आदी साठ प्रकारच्या फळभाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. तिळगुळासह झेंडू, शेवंती अशी फुले आणि रंगीबेरंगी पतंग देखील सजावटीसाठी वापरण्यात आले आहेत.Sakal
फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संत सावता माळी यांच्या 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे.
फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संत सावता माळी यांच्या 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे.Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.