Amarnath Cloudburst : गेल्या १२ वर्षात अमरनाथ यात्रेदरम्यान गुहेजवळ तीनदा ढगफुटी

Amarnath Cloudburst
Amarnath Cloudburst esakal
Updated on

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 15 लोकांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 40 जण बेपत्ता आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

घटनास्थळी एनडीआरएफचे, एसडीआरएफ आणि बचाव पथकाच्या तुकड्या तैनात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या दुर्घटनेमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला आणि पुराच्या तडाख्यात अनेक तंबू वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या १२ वर्षांत अमरनाथ यात्रेदरम्यान गुहेजवळ तीनदा ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ढगफुटीमुळे इतक्या लोकांना जीव गमवावा लागण्याची ही पहिलीच वेळ असून अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2010 मध्येही गुहेजवळ ढग फुटले होते. त्यानंतर 2021 मध्ये, 28 जुलै रोजी गुहेजवळील ढगफुटीत तीन लोक अडकले होते, त्यांची सुटका करण्यात आली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

अमरनाथ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा  30 जूनपासून ही यात्रा सुरू झाली आहे. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे.

या यात्रेत आतापर्यंत 65 हजारांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. परंतु, खराब हवामानामुळे 2 ते 3 दिवस प्रवास थांबवावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.