तुळजापूर येथे अपसिंगा रस्त्यावरील वनविभागाच्या मैदानाजवळ झालेली बैलगाडा शर्यत शिवबाराजे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील , महंत मावजीनाथ, महंत व्यंकटाअरण्य, संयोजक अर्जून साळुंखे, चिन्मय मगर , माजी नगरसेवक नागनाथ भांजी, नरेश अमृतराव, विशाल मगर, नितीन जट्टे, विशाल वाघमारे, सुदश॔न वाघमारे, सचिन अमृतराव, चेतन शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ झाला.
या स्पर्धेत अनेक भागांतून अनेक बैलगाडा मालक आपापले गाडे घेऊन हजर होते. यावेळी त्यांची लगबग पहायला मिळत होती.
बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अनेक ग्रामीण भागातील शर्यतप्रेमींनी गर्दी केली होती. त्यावेळी प्रेक्षकांची झालेली गर्दी.
विविध भागांतल्या बैलगाडा मालकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी गाड्यांनी आणि प्रेक्षकांनी मैदान गजबजले होते. स्पर्धेच्या ठिकाणी रुग्णवाहिका, पाण्याचे स्टाॅल तसेच विविध शितपेयांची दुकाने लावली होती.
शर्यत सुरु होण्याच्या अगोदर बैलाला खेळपट्टीवर आणले जाते. त्यावेळी बैलांना उधळू नये यासाठी काहीजणांनी धरुन ठेवले जाते.
तुळजापूर शहरामध्ये प्रथमच बैलगाड्या स्पर्धा झाल्या होत्या. यापूर्वी स्पर्धेची बंदी उठवल्याने भर उन्हातही स्पर्धक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
एकाच वेळेस पाच ट्रकवरून स्पर्धा चालू होती. सोलापूर तसेच विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातुन बैलगाड्या स्पर्धेसाठी नागरिक, पशुपालक आले होते. स्पर्धा भर उन्हातच दुपार पर्यत चालू होत्या.
सुमारे 1 हजार मीटर अंतर स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. स्पर्धा पाहण्यासाठी भर उन्हात दुतर्फा नागरीक, युवक तसेच शेतकर्यांनी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.