कॉमेडीयन ते आमदार: निवडणुकीत बाजी मारणाऱ्या 'आप'च्या भगवंत मान यांचा प्रवास

पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान ३८००० हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

Updated on

पंजाबमध्ये आप पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भगवंत मान यांनी विधानसभेची जागाही जिंकली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचे दलबीर सिंग गोल्डी यांचा पराभव केला आहे. त्यामुळे तिथे भगवंत मान हे मुख्यमंत्री होणार हा निर्णय जवळजवळ पक्का आहे. त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे.

जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये यावेळी आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करू शकते, असे सागंण्यात आले होते. आप ने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते.  ते सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये यावेळी आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करू शकते, असे सागंण्यात आले होते. आप ने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते. ते सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान ३८००० हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान ३८००० हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
भगवंत मान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७३ साली भारतातील पंजाबमधल्या संगरूर जिल्ह्यातील सतोज या गावात झाला. त्यांनी संगरूरच्या एसयुएस कॉलेजमध्ये बी.कॉम पदवी घेतली. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर काहीतरी हटके करायची इच्छा असल्याने त्यांनी नोकरी केली नाही.

भगवंत मान यांनी विनोदापासून राजकारणापर्यंत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मान यांनी इंद्रप्रीत कौरशी लग्न केले होते. पण दोघे २०१५ साली वेगळे झाले. त्यांना दोन मुले आहेत.

मनप्रीत सिंग बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीमधून त्यांनी राजकीय इनिंग सुरू केली. २०१२ मध्ये त्यांनी लेहरा विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना अपयश आले होते. यानंतर २०१४  मध्ये, भगवंत मान आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले आणि आम आदमी पार्टीच्या तिकीटावर संगरूर लोकसभा मतदारसंघातून 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते.

आता या यशानंतर भगवंत मान यांचा मुख्यमंत्रीपदाचा रस्ता मोकळा झाला आहे. अरविंद केजरीवाल यांची स्ट्रॅटेजी यासाठी कारणीभूत ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.