सोलापूर: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणांविरुद्ध सकाळी 7 वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, गांधी नगर, कमटम नगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत आदी परिसरातील कारखाने कडकडीत बंद ठेवून कामगार भारत बंद, सोलापूर बंद पाळले.
या बंदमध्ये २५ हजार यंत्रमाग कामगार, ६५ हजार विडी कामगार, २५ हजार असंघटीत कामगार, ५ हजार बांधकाम कामगार, अन्य छोट्यामोठ्या व्यवसायातील कामगार असे दीड लाख कामगार सहभाग नोंदवून बंद यशस्वी केले. तसेच तालुका दक्षिण सोलापूर कुंभारी येथील कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत १०० टक्के बंद पाळले गेले.
या वसाहतीतील विडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, छोटेमोठे दुकानदार, रिक्षा, सिटी बस आदि व्यवस्था ठप्प करून ५० हजार कामगार बंद यशस्वी केले. या सर्व लढाऊ, कष्टकरी कामगार कर्मचारी, छोटेमोठे उद्योजक, व्यापारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते आदींनी केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणांचा धिक्कार केले. यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने क्रांतिकारी शुभेच्छासह अभिनंदन केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सिटू सलंग्न लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन, लाल बावटा विडी कामगार युनियन, लाल बावटा असंघटीत कामगार युनियन, अ.भा.जनवादी महिला संघटना, अ.भा.किसान सभा, डी.वाय.एफ.आय., एस.एफ.आय., लाल बावटा दिव्यांग संघटना, लाल बावटा बांधकाम कामगार युनियन, लाल बावटा आशा वर्कर्स युनियन आदि संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सोमवार (ता.२७) सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी 7 वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, गांधी नगर, कमटम नगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत या परिसरात लाल झेंडे हाती घेऊन प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन बंदचे आवाहन केले.
या दरम्यान पोलिसांचे गस्त पथक व ताफा कार्यकर्त्यांचा पाठलाग करत रोखण्याचा प्रयत्न केले. कार्यकर्त्यांवर दडपशाही करत बळजबरीने झेंडे हिसकावून घेतले. कामगारांवर दबाव आणले. तरीही कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत बंदमध्ये कामगारांना सामील केले. ठीक १०.१५ कॉ. नरसय्या आडम (मास्तर) हे यंत्रमागधारक संघ कार्यालय येथे दाखल झाले.
आडम मास्तर येताच पोलिसांचा बंदोबस्त वाढला. पोलीस अधिकारी व कर्मचारी आडम मास्तर यांना घेरले व कामगारांना पांगविण्याचा प्रयत्न सुरु झाला.
तत्काळ सर्व माकपचे कार्यकर्ते यंत्रमाग धारक संघ कार्यालय येथे जमा होऊन तब्बल १ तासभर कार्यकर्त्यांनी गगनभेदी आवाजात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला.
तसेच पोलिसांच्या दडपशाहीचाही निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे कॉ. आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते चालत यंत्रमाग धारक संघ कार्यालय ते थेट पोलीस ठाणे गाठले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.