सेलिब्रेटींच्या सुरक्षेवर सरकारचा कोटींचा खर्च, नावांची यादी पाहिली?

बॉलीवूड (bollywood) सेलिब्रेटींबाबत (celebrities) अनेक समज गैरसमज आहेत.
z + security
z + security Team esakal
Updated on

मुंबई - बॉलीवूड (bollywood) सेलिब्रेटींबाबत (celebrities) अनेक समज गैरसमज आहेत. त्यापैकी एक मोठा समज म्हणजे सेलिब्रेटींना सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा नाहीत. आता हा समज काही अंशी चूकीचा आहे. सरकारचा मोठा खर्च अनेक सेलिब्रेटींवर होत असल्याचे दिसुन आले आहे. आपण अशा सेलिब्रेटींची माहिती घेणार आहोत. त्यात बॉलीवूडमधील रथी महारथी सेलिब्रेटींचा समावेश आहे. आता काही कलाकारांचे पर्सनल बॉडी गार्डही आहेत. त्यांना हायर करणं हे त्यांच्यासाठी फारसं अवघड नाही. पण शासनाकडुन त्यांना सुरक्षा घेणं जास्त संयुक्तिक वाटतं

बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्यापासून आमीर खान (amir khan), शाहरुख खान (shahrukh khan) आणि कंगना राणावत (kangana ranaut) यांना सरकारकडून खास सुरक्षा मिळाली आहे. तर अंबानी परिवाराला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. जी देशात 17 लोकांना आहे. त्यात एक नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. झेड प्लस सुरक्षामध्ये 55 कमांडरचा समावेश असतो. जे कमांडर 10 एलिट लेवलचे नॅशनल सिक्युरिटी गार्डस असतात. जे 24 तास त्या सेलिब्रेटींची काळजी घेतात.

फिल्मी सेलिब्रेटींशिवाय अंबानी परिवाराला जी सिक्युरिटी दिली जाते त्यात देखील सरकारचे कित्येक रुपयांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांकडून खास सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यांच्या घराबाहेर कायम सुरक्षा गार्ड तैनात असतात. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बिग बी यांची सुरक्षा वाढविण्यात आली होती.

कंगना राणावतला केंद्र सरकारनं वाय प्लस सिक्युरिटी दिली आहे. कंगना ही बॉलीवूडची पहिली अशी अभिनेत्री आहे की, तिला ही सुरक्षा आहे. दहा ते बारा सीआरपीएफचे जवान 24 तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तिच्या आजुबाजुला असतात. त्या सुरक्षेसाठी कंगनाचे महिन्याला 10 लाख खर्च तयार होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.