आजही आपल्या शेतात जाऊन काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करत सर्वांनाच धक्का दिलाय.
eknath shinde is the only chief minister who works in his farm
eknath shinde is the only chief minister who works in his farmSAKAL
Updated on

देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करत सर्वांनाच धक्का दिलाय. शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी विराजमाना व्हावा, हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते आणि गुरुवारी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.

ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

महाबळेश्वरपासून ७० किलोमीटरवर असलेल्या, कोयना नदीच्या काठावर असलेल्या, दरे गावात अवघी ३० घरे आहेत.
महाबळेश्वरपासून ७० किलोमीटरवर असलेल्या, कोयना नदीच्या काठावर असलेल्या, दरे गावात अवघी ३० घरे आहेत.
एक-दोन दिवस गावाला घालवल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत थेट शेत गाठतात.
एक-दोन दिवस गावाला घालवल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत थेट शेत गाठतात.
एकनाथ शिंदे गावात आपल्या शेतामध्ये भातरोपण करताना काही फोटो पण पुढे आले आहे. एक मंत्री आपला सर्व मानसन्मान बाजूला ठेवत शेतीची कामे करतानाचे चित्र सध्या परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे.
एकनाथ शिंदे गावात आपल्या शेतामध्ये भातरोपण करताना काही फोटो पण पुढे आले आहे. एक मंत्री आपला सर्व मानसन्मान बाजूला ठेवत शेतीची कामे करतानाचे चित्र सध्या परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे.
गावाच्या एका बाजूला जंगल आहे तर दुसऱ्या बाजूला कोयनेचे धरणक्षेत्र आहे. गावात उत्पन्नाचा काही ठोस स्रोत नसल्याने त्यांना मुंबई किंवा पुणे गाठावे लागते.
गावाच्या एका बाजूला जंगल आहे तर दुसऱ्या बाजूला कोयनेचे धरणक्षेत्र आहे. गावात उत्पन्नाचा काही ठोस स्रोत नसल्याने त्यांना मुंबई किंवा पुणे गाठावे लागते.
गावात ना शाळा आहे ना कोणते हॉस्पिटल. गावकऱ्यांना शिक्षणासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी तपोला या गावावर अवलंबून राहावे लागते.
गावात ना शाळा आहे ना कोणते हॉस्पिटल. गावकऱ्यांना शिक्षणासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी तपोला या गावावर अवलंबून राहावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.