ENG vs IND: तिसऱ्या सामन्यापूर्वी, कोहली-जडेजा मैदानात गाळत आहे घाम, पाहा फोटो

सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव केला. विशेषत: विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सराव करताना खूप घाम गाळला.
Virat Kohli Ravindra Jadeja practice
Virat Kohli Ravindra Jadeja practice
Updated on

England vs India 3rd ODI Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. त्याचवेळी इंग्लंडने दुसरा सामना 100 धावांनी जिंकला. आता तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रात विराट कोहलीने जोरदार घाम गाळला आहे. त्याने नेटवर बराच वेळ सराव केला.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रात विराट कोहलीने जोरदार घाम गाळला आहे. त्याने नेटवर बराच वेळ सराव केला.
रवींद्र जडेजानेही गोलंदाजीचा जोरदार सराव केला. जडेजाला इंग्लंड दौऱ्यात चेंडूवर फारसे काही करता आलेले नाही. त्याने बॅटने अनेक उपयुक्त खेळी खेळल्या आहेत, पण चेंडूच्या बाबतीत तो निराशाजनक ठरला आहे.
रवींद्र जडेजानेही गोलंदाजीचा जोरदार सराव केला. जडेजाला इंग्लंड दौऱ्यात चेंडूवर फारसे काही करता आलेले नाही. त्याने बॅटने अनेक उपयुक्त खेळी खेळल्या आहेत, पण चेंडूच्या बाबतीत तो निराशाजनक ठरला आहे.
भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने सामन्यापूर्वी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबत बरीच चर्चा केली होती. दुसऱ्या वनडेत पंत खातेही न उघडता बाद झाला होता. त्याचबरोबर टी-20 मालिकेतही तो विशेष काही करू शकला नाही.

सूर्यकुमार यादवनेही या सामन्यापूर्वी भरपूर सराव केला. तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले, मात्र एकदिवसीय मालिकेत त्याला फारशी कामगिरी करता आलेली नाही.
सूर्यकुमार यादवनेही या सामन्यापूर्वी भरपूर सराव केला. तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले, मात्र एकदिवसीय मालिकेत त्याला फारशी कामगिरी करता आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.