१ जुनपासून शासनाकडून मासेमारीवर बंदी; कोकणात आदेश जारी

हर्णे बंदरातील मासेमारी नौका समुद्राबाहेर काढण्यासाठीची मच्छीमारांची धावपळ उडाली
konkan news
konkan newsesakal
Updated on
Summary

पावसाळ्यात मासे आणि अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने १ जून ते ३१ जुलै  या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारीवर शासनाकडून बंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हर्णे बंदरातील मासेमारी नौका समुद्राबाहेर काढण्यासाठीची मच्छीमारांची धावपळ पहायला मिळाली.

मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या पैकी ४० टक्के नौका किनाऱ्यावर घेऊन शाकारण्याची तयारी जोरदार सुरू आहे. तर ४० टक्के नौका या होळी सणानंतरच आंजर्ले खाडीत बंद अवस्थेत उभ्या ठेवल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठीचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जात असून या बंदरात साधारणपणे ९०० ते १००० परवानाधारक मासेमारी नौका आहेत.

शासनाने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या काळात  निर्धारित केलेल्या कालावधीत माशांचा प्रजनन काळ असल्याने या काळात मासेमारीला बंदी असते.  पावसाळ्यातील वातावरण लक्षात घेता मासेमारी बंदी असल्याने बंदरातील बोटी जेटी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मासेमारांची लगबग सुरू होती.

गेली वर्षभर मासळी हंगाम मच्छिमारांना  मच्छिमारी व्यवसायात आर्थिक प्राप्तीच्या मानाने कठीण गेलेला असून मच्छिमार व्यवसाय हा तोट्यातच आहे. सुरुवातीला बदलत्या हवामानाचा फटका मच्छिमारीला बसला होता.

कधी वादळसदृष्य परिस्थितीमुळे मासेमारी बंद होती तर कधी फास्टर आणि एलईडी बंदीच्या मागणीसाठी मच्छिमारांना रस्त्यावर उतरावे लागल्याने मासेमारी बंदी होती.

या वर्षी डिझेलच्या चढत्या दराने मच्छीमारांचे कंबरडेच मोडले होते. हंगामाच्या सुरुवातीला ८० रुपये प्रती लिटर दर होता. आणि तो दर वाढत वाढत १२३ रुपये प्रती लिटर पर्यंत गेल्यामुळे आठ महिन्यात ४३ रुपयांची वाढ झाली.

गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी च्या डिझेल दरवाढीने आमचे तोंडचं फोडले. आठ दिवसांसाठी मासेमारीला जाण्यासाठी १००० लिटर डिझेल भरायचे असेल तर किमान लाख ते सव्वा लाख रुपयांची व्यवस्था करायला लागत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.