Guru Pournima: 'या' गुरु शिष्यांची आजही दिली जाते उपमा

देशात आषाढ पौर्णिमा हा गुरु दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात गुरुंची पूजा केली जाते.
Guru Pournima
Guru Pournimasakal
Updated on

जगात गुरुपेक्षा कोणीही मोठा नाही. गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. कदाचित त्यामुळेच आपल्या देशात गुरुंची पूजा करण्याची समृद्ध परंपरा आहे. देशात आषाढ पौर्णिमा हा गुरु दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात गुरुंची पूजा केली जाते.

हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे की जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर गुरुकडे जा, कारण गुरू हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवू शकतो. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण अशा गुरुबद्दल बोलूया ज्यांच्या ज्ञानाने प्रकाशित झालेले शिष्य आज जगात महान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे.

विश्वामित्र-राम
भारतात गुरूचे महत्त्व आणि गुरू-शिष्याच्या नात्याबद्दल पौराणिक ग्रंथांमध्ये बरेच काही लिहिले गेले आहे. रामायणात, अयोध्येचा राजकुमार, राम हे विश्वामित्र यांचे शिष्य असल्याचे म्हटले आहे.विश्वामित्रांनी तरुणपणी रामाला प्रबोधन केले होते.खर तर रामाचा महिमा हा विश्वामित्र पेक्षा जास्त आहे. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणत. पण गुरूंच्या प्रभावामुळेच रामाला मोठे व्यक्तिमत्त्व म्हणून जग ओळखतात.
विश्वामित्र-राम भारतात गुरूचे महत्त्व आणि गुरू-शिष्याच्या नात्याबद्दल पौराणिक ग्रंथांमध्ये बरेच काही लिहिले गेले आहे. रामायणात, अयोध्येचा राजकुमार, राम हे विश्वामित्र यांचे शिष्य असल्याचे म्हटले आहे.विश्वामित्रांनी तरुणपणी रामाला प्रबोधन केले होते.खर तर रामाचा महिमा हा विश्वामित्र पेक्षा जास्त आहे. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणत. पण गुरूंच्या प्रभावामुळेच रामाला मोठे व्यक्तिमत्त्व म्हणून जग ओळखतात.
परशुराम-कर्ण
रामायणानंतर,आपल्याला महाभारतातील गुरु-शिष्याच्या समृद्ध परंपरेचे वर्णन मिळते. महाभारतात गुरू आणि शिष्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यापैकी परशुराम आणि कर्ण हे सर्वात वेगळे आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत कर्णाला जातीभेदाला सामोरे जावे लागले.यामुळे त्याला कौरव किंवा पांडवांप्रमाणे राजकुलातील गुरूंकडून शिक्षण घेता आले नाही. कर्णाने परशुरामाकडून शिक्षण घेतले. पण परशुराम फक्त ब्राह्मणांनाच शिकवायचे, म्हणून कर्णाने नकली धागा घातला. असे म्हटले जाते की परशुराम आपल्या शिष्याच्या प्रतिभेवर इतके प्रसन्न झाले की त्यांनी कर्णाला युद्धकलेचे प्रत्येक कौशल्य शिकवले.
परशुराम-कर्ण रामायणानंतर,आपल्याला महाभारतातील गुरु-शिष्याच्या समृद्ध परंपरेचे वर्णन मिळते. महाभारतात गुरू आणि शिष्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यापैकी परशुराम आणि कर्ण हे सर्वात वेगळे आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत कर्णाला जातीभेदाला सामोरे जावे लागले.यामुळे त्याला कौरव किंवा पांडवांप्रमाणे राजकुलातील गुरूंकडून शिक्षण घेता आले नाही. कर्णाने परशुरामाकडून शिक्षण घेतले. पण परशुराम फक्त ब्राह्मणांनाच शिकवायचे, म्हणून कर्णाने नकली धागा घातला. असे म्हटले जाते की परशुराम आपल्या शिष्याच्या प्रतिभेवर इतके प्रसन्न झाले की त्यांनी कर्णाला युद्धकलेचे प्रत्येक कौशल्य शिकवले.
द्रोण-अर्जुन
महाभारतात, गुरु-शिष्य परंपरेत सर्वात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे द्रोणाचार्य आणि अर्जुन. पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाची प्रतिभा पाहून गुरु द्रोणाचार्य यांनी या शिष्याला जगातील महान धनुर्धर म्हणून प्रस्थापित केले. महाभारतातील पौराणिक कथेनुसार, अर्जुनावरील अत्यंत प्रेमामुळे द्रोणाचार्यांचे अनेक प्रकरणांमध्ये पक्षपाती म्हणूनही वर्णन करण्यात आले आहे.एकलव्य आणि कर्णाची उदाहरणे बघितली तर द्रोणाचार्यांचा पक्षपाती दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. पण अर्जुन आणि द्रोण यांच्यातील गुरु-शिष्य नाते पाहता, एका विद्वान गुरूचा महान शिष्य असल्याची कथा समोर येते.
द्रोण-अर्जुन महाभारतात, गुरु-शिष्य परंपरेत सर्वात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे द्रोणाचार्य आणि अर्जुन. पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाची प्रतिभा पाहून गुरु द्रोणाचार्य यांनी या शिष्याला जगातील महान धनुर्धर म्हणून प्रस्थापित केले. महाभारतातील पौराणिक कथेनुसार, अर्जुनावरील अत्यंत प्रेमामुळे द्रोणाचार्यांचे अनेक प्रकरणांमध्ये पक्षपाती म्हणूनही वर्णन करण्यात आले आहे.एकलव्य आणि कर्णाची उदाहरणे बघितली तर द्रोणाचार्यांचा पक्षपाती दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. पण अर्जुन आणि द्रोण यांच्यातील गुरु-शिष्य नाते पाहता, एका विद्वान गुरूचा महान शिष्य असल्याची कथा समोर येते.
रामकृष्ण-विवेकानंद
आधुनिक काळातील सर्वात प्रसिद्ध गुरु-शिष्य जोड्यांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. बंगालमधील दक्षिणेश्वर मंदिरातील संत रामकृष्ण यांच्या ज्ञानातून विवेकानंद इतके प्रतिभावान झाले की आजही जग विवेकानंदांच्या विचारांची पुजा करतात.महान गुरूचे महत्त्व आणि त्यांच्या विद्वान शिष्याची कीर्ती याचे याहून चांगले आणि अचूक उदाहरण तुम्हाला सापडणार नाही.
रामकृष्ण-विवेकानंद आधुनिक काळातील सर्वात प्रसिद्ध गुरु-शिष्य जोड्यांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. बंगालमधील दक्षिणेश्वर मंदिरातील संत रामकृष्ण यांच्या ज्ञानातून विवेकानंद इतके प्रतिभावान झाले की आजही जग विवेकानंदांच्या विचारांची पुजा करतात.महान गुरूचे महत्त्व आणि त्यांच्या विद्वान शिष्याची कीर्ती याचे याहून चांगले आणि अचूक उदाहरण तुम्हाला सापडणार नाही.
गोखले-गांधी
महात्मा गांधींनी गोपाळ कृष्ण गोखले यांची राजकीय गुरू म्हणून वर्णन केले होते. गोखले यांनीच मोहनदास करमचंद गांधींना आधी भारत समजून घ्या आणि नंतर काहीतरी करा असा सल्ला दिला होता.
गोखले-गांधी महात्मा गांधींनी गोपाळ कृष्ण गोखले यांची राजकीय गुरू म्हणून वर्णन केले होते. गोखले यांनीच मोहनदास करमचंद गांधींना आधी भारत समजून घ्या आणि नंतर काहीतरी करा असा सल्ला दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.