जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या जाणवायला लागते, तेव्हा आपण तत्काळ डॉक्टरांशी (Doctor) संपर्क साधतो आणि त्यांच्याकडून औषधं लिहून घेतो. परंतु, आपल्याला ठाऊक आहे, भारतीय आयुर्वेदातही बर्याच रोगांचा उपचार केला जात होता आणि तो आजही होतोय. आयुर्वेदात बर्याच प्रकारच्या पुष्पांचा (फुलं) उपयोग अनेक काळापासून केला जात आहे, ज्याच्या मदतीनं अनेक रोग दूर झालेत. ही फुलं औषध म्हणूनही वापरली जातात. आपल्याला आश्चर्य वाटेल, की या फुलांमध्ये त्वचेच्या समस्यांपासून ते बऱ्याच प्रकारच्या संक्रमणापर्यंत बरं करण्याचं सामर्थ्य आहे. गुलाब, केशर, चाफा, कमळ यांसारख्या फुलांचा रस तयार करुन त्याचं सेवन केला जातं. यामुळे, आपल्या शरीराला हे बरेच फायदेशीर ठरतं. तर मग या फुलांविषयी जाणून घ्या, कोणत्या रोगांमध्ये याचा अधिक फायदा होऊ शकतो.