Heritage Places in Pune: वर्ल्ड हेरिटेज दिन अर्थात जागतिक वारसा दिन (World Heritage Day) हा आपल्या वैभवशाली सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि आपला पुरातन वारसा जपण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. युवा पिढीला त्यांचे सांस्कृतिक वैभव जपण्याचा आणि तो वारसा पुढील पिढीकडे नेत राहण्याबद्दल महत्त्वाचा संदेश देणे हा दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर `रॉयल एनफिल्ड` या दुचाकी कंपनीने पुणेकरांना शहरातील ऐतिहासिक स्थळांना `क्लासिक ३५०` द्वारे भेट देण्याचे आवाहन केले आहे.
दख्खनची राणी अशी ओळख मिळालेले पुणे शहर दख्खनच्या पठारावर स्थित आहे. पेशव्यांची जुनी राजधानी असलेले पुणे शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र देखील आहे. पुण्यातील पुरातन स्थळे ही मराठा राज्यकर्त्यांची आणि तेथे वास्तव्यास असलेल्या पौराणिक भारतीयांना वाहिलेली आदरांजली आहेत. या स्थळांवर आढळणारे अप्रतिम बारकावे आणि यांचा इतका विस्तृत परिसर तो काळ आपल्यासमोर पुन्हा नव्याने उभा करतो. `रॉयल एनफील्ड` कणखरपणा, दीर्घकालीन टिकाऊपणा १९०१ पासून सांभाळत आहे. कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून मोटरसायकल चालवण्यातील धमाल अनुभव देणे कायम ठेवले आहे. त्यामुळे जागतिक वारसा दिनानिमित्त नवीन क्लासिक ३५०वर स्वार होऊन नयनरम्य पाच स्थळांची आरामदायी राईड करावी, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.