Independence Day: देशप्रेम जागवणारे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टीव्हीवर अनेक देशभक्तीपर चित्रपट दाखवले जातात
Independence Day
Independence Dayesakal
Updated on

भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 75व्या वर्षी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टीव्हीवर अनेक देशभक्तीपर चित्रपट दाखवले जातात. इतकचं नाही तर, बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत, जे पाहणाऱ्या दर्शकाच्या मनात देशप्रेम जागृत करतात. चला तर, जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल

बॉर्डर - ‘संदेसे आते है...’ या गाण्याने प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारा जेपी दत्ता यांचा हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

उरी: सर्जिकल स्ट्राईक - 2016 मध्ये पाकिस्तानच्या उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर 2019 साली चित्रपट बनवण्यात आला.

भुज: द प्राईड ऑफ इंडिया-1971मध्ये भारतीय हवाई दलाच्या भुज विमानतळाचे प्रभारी असलेले स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक, अनेक आव्हानांना तोंड देत माधापूरमधील एका गावातील सुमारे 300 महिलांच्या मदतीने खराब झालेला टेक ऑफ ट्रॅकची पुनर्रचना करताना दाखवले आहेत.

शेरशाह - परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.

राझी - 'कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट सेहमत खान या तरुण काश्मिरी मुलीची प्रेरणादायी कथा आहे, जी इक्बाल सय्यद या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करते आणि भारतीय गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते.

'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' - हा चित्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे.

'मेजर' - हा चित्रपट शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा बायोपिक आहे. यामध्ये आदिवी शेषाने संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. संदीप उन्नीकृष्णन हे 2008 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झाले होते.

'सरदार उधम'-हा विलक्षण चित्रपट क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्यावर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.