IPL 2022 मधून 'या' ५ दिग्गजांनी का घेतली माघार?

ipl 2022 mega auction update
ipl 2022 mega auction update sakal
Updated on

आयपीएल 2022 (IPL-2022) ची रिटेन्शन प्रक्रिया पार पडली. याचबरोबर आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये (Mega Auction) सहभाग नोंदवण्यासाठी खेळाडूंच्या नोंदणी प्रक्रियेची देखील 20 जानेवारी ही शेवटची तारीख होती. ही नोंदणी प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी यंदाच्या हंगामासाठी नोंदणीच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. याचबरोबर आता T-20 क्रिकेटचा युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल देखील आपल्याला आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. ख्रिस गेल पाठोपाठ, जो रुट, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि मिचेल स्टार्क यांनी देखील आयपीएल 2022 च्या लिलाव प्रक्रियेसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच सॅम करन देखील दुखापतीतून सावरण्यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम खेळणार नाही.(IPL 2022 Mega Auction Update)

ख्रिस गेल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू आहे. यावेळी तो स्पर्धेत दिसणार नाही. मेगा लिलावापूर्वी गेलने आपले नाव मागे घेणे हे एक युग संपत असल्याचे सूचित करते. गेल्या काही आयपीएलमध्ये गेलचा फॉर्मही चांगला राहिला नाही आणि अलीकडच्या काळात तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. गेल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याने या स्पर्धेत अनेक संस्मरणीय आणि अविश्वसनीय खेळी खेळल्या आहेत.

2013 मध्ये त्याने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध सर्वाधिक 175 धावांची खेळी खेळली होती. गेलने 142 आयपीएल सामन्यांमध्ये 4965 धावा करण्यासोबतच 357 षटकार ठोकले आहेत. गेल्या वर्षी तो पंजाब किंग्जकडून खेळताना दिसला होता, मात्र यावेळी संघाने त्याला कायम ठेवले नाही.
ख्रिस गेल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू आहे. यावेळी तो स्पर्धेत दिसणार नाही. मेगा लिलावापूर्वी गेलने आपले नाव मागे घेणे हे एक युग संपत असल्याचे सूचित करते. गेल्या काही आयपीएलमध्ये गेलचा फॉर्मही चांगला राहिला नाही आणि अलीकडच्या काळात तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. गेल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याने या स्पर्धेत अनेक संस्मरणीय आणि अविश्वसनीय खेळी खेळल्या आहेत. 2013 मध्ये त्याने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध सर्वाधिक 175 धावांची खेळी खेळली होती. गेलने 142 आयपीएल सामन्यांमध्ये 4965 धावा करण्यासोबतच 357 षटकार ठोकले आहेत. गेल्या वर्षी तो पंजाब किंग्जकडून खेळताना दिसला होता, मात्र यावेळी संघाने त्याला कायम ठेवले नाही.sakal
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्सही यावेळी आयपीएलमध्ये दिसणार नाही. IPL 2021 मध्ये दुखापतीमुळे बेन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यानंतर, फेज-2 सुरू होण्यापूर्वीच, बायो बबलमुळे त्रासून त्याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. अ‍ॅशेस मालिकेतून बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, पण त्याला फारशी कामगिरी करता आली नाही. 5 अ‍ॅशेस सामन्यात त्याने फक्त 236 धावा केल्या आणि फक्त 4 विकेट घेऊ शकला. स्टोक्स आता न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्सही यावेळी आयपीएलमध्ये दिसणार नाही. IPL 2021 मध्ये दुखापतीमुळे बेन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यानंतर, फेज-2 सुरू होण्यापूर्वीच, बायो बबलमुळे त्रासून त्याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. अ‍ॅशेस मालिकेतून बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, पण त्याला फारशी कामगिरी करता आली नाही. 5 अ‍ॅशेस सामन्यात त्याने फक्त 236 धावा केल्या आणि फक्त 4 विकेट घेऊ शकला. स्टोक्स आता न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे.sakal
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटनेही कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मेगा लिलावात आपले नाव दिलेले नाही. अ‍ॅशेसमधील दारुण पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचे संपूर्ण लक्ष कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यावर आहे.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटनेही कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मेगा लिलावात आपले नाव दिलेले नाही. अ‍ॅशेसमधील दारुण पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचे संपूर्ण लक्ष कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यावर आहे.sakal
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही यावेळी आयपीएलमध्ये दिसणार नाही. आर्चर कोपरच्या दुखापतीमुळे त्रस्त असून गेल्या वर्षी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. जोफ्रा बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे आणि त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अजून वेळ लागेल. त्याला आपले शरीर धोक्यात घालायचे नाही, त्यामुळे त्याने आयपीएल 2022 मधून आपले नाव काढून घेतले आहे. आर्चर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे आणि यावेळी संघाने त्याला कायम ठेवलेले नाही.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही यावेळी आयपीएलमध्ये दिसणार नाही. आर्चर कोपरच्या दुखापतीमुळे त्रस्त असून गेल्या वर्षी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. जोफ्रा बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे आणि त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अजून वेळ लागेल. त्याला आपले शरीर धोक्यात घालायचे नाही, त्यामुळे त्याने आयपीएल 2022 मधून आपले नाव काढून घेतले आहे. आर्चर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे आणि यावेळी संघाने त्याला कायम ठेवलेले नाही.sakal
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकाची तयारी पूर्ण करण्यासाठी तो आयपीएलमध्ये परतणार असल्याचे त्याने सांगितले होते, परंतु आता त्याने आपले नाव देण्यास नकार दिला आहे. मात्र, याचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकाची तयारी पूर्ण करण्यासाठी तो आयपीएलमध्ये परतणार असल्याचे त्याने सांगितले होते, परंतु आता त्याने आपले नाव देण्यास नकार दिला आहे. मात्र, याचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही.sakal
सॅम करन देखील दुखापतीतून सावरण्यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम खेळणार नाही.
सॅम करन देखील दुखापतीतून सावरण्यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम खेळणार नाही.sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.