IPL 2023 Auction : लिलावात हे 5 'वयस्कर' खेळाडू करू शकतात धमाका

IPL 2023 Auction
IPL 2023 Auction esakal
Updated on

IPL 2023 Auction : आयपीएल 2023 साठीची मिनी लिलाव प्रक्रिया येत्या 23 डिसेंबरला कोची येथे पार पडणार आहे. यंदाच्या लिलावात खेळाडूंची संख्या आणि संघांच्या पर्समध्ये असलेला मार्यादित पैसा लक्षात घेता हा लिलाव फार लांबणार नाही असे दिसतयं. मात्र नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकपच्या पार्शवभूमीवर हा लिलाव आकर्षक ठरण्याची देखील शक्यता आहे. विशेष म्हणजे या लिलावात काही असे खेळाडू देखील आहेत ज्यांनी वयाची चाळीशी पार केली आहे. मात्र तरी देखील ते लिलावात धमाका करू शकतात. अशाच पाच वयस्कर खेळाडू आपण पाहणार आहोत.

अमित मिश्रा

भारताचा अनुभवी लेग स्पिनर यंदाच्या आयपीएल लिलावात आपला जलवा दाखवू शकतो. गेल्यावर्षीच्या हंगामात त्याला कोणी खरेदी केले नव्हते. मात्र यंदाचा आयपीएल लिलाव हा भारतात होणार आहे. त्यामुळे त्याला वयाच्या चाळीशीत देखील पुन्हा एकदा आयपीएल खेळण्याची संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये 154 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत.
अमित मिश्रा भारताचा अनुभवी लेग स्पिनर यंदाच्या आयपीएल लिलावात आपला जलवा दाखवू शकतो. गेल्यावर्षीच्या हंगामात त्याला कोणी खरेदी केले नव्हते. मात्र यंदाचा आयपीएल लिलाव हा भारतात होणार आहे. त्यामुळे त्याला वयाच्या चाळीशीत देखील पुन्हा एकदा आयपीएल खेळण्याची संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये 154 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद नबी

आयपीएलच्या लिलावात उतरणाऱ्या वयस्कर खेळाडूंमध्ये अफगाणिस्ताचा कर्णधार मोहम्मद नबीचा देखील समावेश आहे. नबी सध्या 34 वर्षाचा आहे. नबी अनेक हंगाम सनराईजर्स हैदराबाद कडून खेळला. गेल्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सकडे गेला. मात्र आता केकेआरने त्याला रिलीज केले आहे. त्यामुळे आता नबी मिली लिलावात उतरणार आहे.
मोहम्मद नबी आयपीएलच्या लिलावात उतरणाऱ्या वयस्कर खेळाडूंमध्ये अफगाणिस्ताचा कर्णधार मोहम्मद नबीचा देखील समावेश आहे. नबी सध्या 34 वर्षाचा आहे. नबी अनेक हंगाम सनराईजर्स हैदराबाद कडून खेळला. गेल्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सकडे गेला. मात्र आता केकेआरने त्याला रिलीज केले आहे. त्यामुळे आता नबी मिली लिलावात उतरणार आहे.
डेविड विजा 
यंदाच्या लिलावात नामीबियाकडून खेळणारा डेविड विजा देखील हॅमरखालून जाणार आहे. यापूर्वी देखील विजा आयपीएलमध्ये खेळला होता. तो रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडून 15 सामने खेळला आहे. तो सध्या 37 वर्षांचा आहे. विजा यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून देखील खेळला आहे.
डेविड विजा यंदाच्या लिलावात नामीबियाकडून खेळणारा डेविड विजा देखील हॅमरखालून जाणार आहे. यापूर्वी देखील विजा आयपीएलमध्ये खेळला होता. तो रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडून 15 सामने खेळला आहे. तो सध्या 37 वर्षांचा आहे. विजा यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून देखील खेळला आहे.
सिकंदर रझा
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सिकंदर रझावर देखील यंदाच्या लिलावात मोठी बोली लागू शकते. तो फिरकी अष्टपैलू असल्याने अनेक संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत. रझा 36 वर्षाचा असून टी 20 फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 1259 धावा असून त्याने 38 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
सिकंदर रझा ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सिकंदर रझावर देखील यंदाच्या लिलावात मोठी बोली लागू शकते. तो फिरकी अष्टपैलू असल्याने अनेक संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत. रझा 36 वर्षाचा असून टी 20 फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 1259 धावा असून त्याने 38 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
ख्रिस्टियान जोनकर 
दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस्टियान जोनकर देखील यंदाच्या मिनी लिलावात आपले नशीब आजमावणार आहे. तो 36 वर्षाचा असून त्याला दक्षिण आफ्रिकेकडून 2018 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यानंतर तो संघाबाहेर फेकला गेला. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्याने आयपीएलचा दरवाजा ठोठावला आहे.
ख्रिस्टियान जोनकर दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस्टियान जोनकर देखील यंदाच्या मिनी लिलावात आपले नशीब आजमावणार आहे. तो 36 वर्षाचा असून त्याला दक्षिण आफ्रिकेकडून 2018 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यानंतर तो संघाबाहेर फेकला गेला. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्याने आयपीएलचा दरवाजा ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.