'कृष्णा'काठ दुमदुमला, सांगलीकरांनी अनुभवला होड्यांच्या शर्यतींचा थरार, पाहा PHOTO

यंदा शर्यतींचा थरार सांगलीकरांनी मोठ्या उत्साहात अनुभवला, ‘कृष्णा’काठी दुतर्फा मोठी गर्दी दिसून आली.
boat races in sangli
boat races in sangli
Updated on
Summary

सांगली : आधी महापूर, त्यानंतरच्या कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून होड्यांच्या शर्यती झाल्या नव्हत्या. मात्र यंदा शर्यतींचा थरार सांगलीकरांनी मोठ्या उत्साहात अनुभवला. ‘कृष्णा’काठी दुतर्फा मोठी गर्दी दिसून आली. टाळ्या आणि शिट्यांनी सारा परिसरा दुमदुमला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात सांगलीवाडीतील ‘रॉयल कृष्णा बोट क्लब’ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर त्याच क्लबच्या दुसऱ्या टीमने द्वितीय आणि डिग्रजमधील ‘श्री जी बोट क्लब’ने तृतीय क्रमांक पटकावला. फोटो टिपलेत 'सकाळ'चे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी... (boat races in sangli)

आधी महापूर, त्यानंतरच्या कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून होड्यांच्या शर्यती झाल्या नव्हत्या. मात्र यंदा शर्यतींचा थरार सांगलीकरांनी मोठ्या उत्साहात अनुभवला. ‘कृष्णा’काठी दुतर्फा मोठी गर्दी दिसून आली. टाळ्या आणि शिट्यांनी सारा परिसरा दुमदुमला.

माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीवाडीतील फ्रेंड्स यूथ फाउंडेशन, रणसंग्राम मंडळ आणि जिल्हा रोईंग असोसिएशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील नऊ बोट क्लब या स्पर्धेत सहभागी झाले होते.

सायंकाळी पाचला स्पर्धेला सुरवात झाली. आयर्विन पुलाजवळ समांतर पुलाचे काम सुरू असल्याने पाण्याला मोठ्या प्रमाणावर ओढ होती. त्यात अत्यंत चुरशीने सामने झाले. पहिल्या फेरीपासूनच दोन्ही रॉयल कृष्णा बोट क्लबची चुरस कायम होती. अखेर ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावले.

विजेत्यांना दहा हजार एक रुपयांचे पारितोषिक आणि ढाल देण्यात आली, तर उपविजेत्यास सात आणि तृतीय क्रमांकास पाच हजारांचे पारितोषिक देण्यात आले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विशाल पाटील, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत शंकर घाटावर पारितोषिक वितरण सोहळा झाला.

विजयानंतर खेळाडूंनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. नगरसेवक हरिदास पाटील, जी. के. पवार, आनंदराव पाटील, पी. आर. पाटील, अशोक पवार, शामराव मगदूम, सुखदेव मोहिते, अशोक पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सांगलीवाडी सहकारी सोसायटीचे संचालक महाबळेश्‍वर चौगुले, संपत पाटील, उमेश पाटील, सच्चिदानंद कदम, प्रताप जामदार, विष्णू जामदार, सागर यादव, राहुल पाटील, नितीश पाटील, प्रमोद कोळी यांनी संयोजन केले. पांडुरंग पाटील, राष्ट्रीय खेळाडू दीपक हारूगडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दत्ता पाटील, विनोद नलवडे, सागर यादव, गजानन यादव, वैभव पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.

बोट उलटली... 

स्पर्धा सुरू असताना आयर्विन पुलाजवळ नव्या पुलाचे काम सुरू असल्याने पाण्याच्या प्रवाहाला मोठी ओढ होती. त्यात तरूण मराठा बोट क्लबची बोट अचानक उलटली. सुदैवाने कोणत्याही खेळाडूला इजा झाली नाही. प्रवाहात बोट वाहून गेली. मात्र काही अंतरावर बोट मिळून आली
बोट उलटली... स्पर्धा सुरू असताना आयर्विन पुलाजवळ नव्या पुलाचे काम सुरू असल्याने पाण्याच्या प्रवाहाला मोठी ओढ होती. त्यात तरूण मराठा बोट क्लबची बोट अचानक उलटली. सुदैवाने कोणत्याही खेळाडूला इजा झाली नाही. प्रवाहात बोट वाहून गेली. मात्र काही अंतरावर बोट मिळून आली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.