सांगली: भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. जागतिक ख्याती प्राप्त लतादिदींचे बालपण सांगलीत गेले. येथील स्टॅंड परिसरात त्यांचे घर होते तर मारुती चौकातील नगरपालिका शाळेत त्या शिकल्या. काही काळाने मंगेशकर कुटुंबिय सांगली (Sangli) सोडून गेले, मात्र लतादिदी हरिपूर (Haripur) येथील बागेतील गणपतीच्या दर्शनासाठी अधून-मधून येत होत्या. सन २००० साली महापालिकेने सुवर्णांकित प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ (Deenanath Mangeshkar)यांच्या नावे येथे एका नाट्यगृह आहे. तेथे मास्टर दीनानाथ यांच्या पुतळ्याचे अनावरणही दिदींच्या हस्ते झाले होते. त्या सोहळ्यातील आणि अन्य काही आठवणीतील क्षणचित्रांचे संकलन केले आहे सांगलीचे छायाचित्रकार उल्हास देवकर , बातमीदार अजित झळके यांनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.