LGBT Couple : भारतीय LGBT जोडप्यांच्या लग्नाची फॅशन 5 वेळा ठरली चर्चेचा विषय...

आपण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ठराविक वैशिष्ट्यावरून तिला एखादे टोपण नाव देतो. तसंच एखाद्या विशिष्ट समुदायाची ओळखही त्यांच्या काही वैशिष्ट्यांवरून होते.
LGBT Couple
LGBT CoupleEsakal
Updated on
Summary

आपण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ठराविक वैशिष्ट्यावरून तिला एखादे टोपण नाव देतो. तसंच एखाद्या विशिष्ट समुदायाची ओळखही त्यांच्या काही वैशिष्ट्यांवरून होते. त्याचप्रमाणे एलजीबीटीक्यूआयए प्लस (LGBTQIA+) या समुदायातले नागरिक त्यांच्या पेहरावावरून किंवा दिसण्यावरून ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या लैंगिक आवडींवरून ओळखले जातात. म्हणजेच, लैंगिक संबंधासाठी ते कोणत्या लिंगाकडे आकर्षित होतात आणि स्वतःला शरीरापेक्षा (पुरुष किंवा स्त्रीलिंगी) वेगळ्या रूपात पाहतात. त्यावरून त्यांची ओळख ठरवली जाते. या समुदायाच्या नावातल्या चिन्हाचा अर्थ त्याच्याशी निगडित आहे.

आजच्या लेखात आपण भारतीय LGBT जोडप्यांच्या लग्नाची फॅशन कसा चर्चेचा विषय ठरली ते पाहू या..

इंडो-अमेरिकन लेस्बियन जोडपे
आपण अनुजा अंकोला आणि अॅड्रिएन रोचेटी यांच्याबद्दल बोलत आहोत. अनुजा मूळची भारताची आहे, तर अॅड्रिन अमेरिकेची आहे. जेव्हा या दोन्ही स्त्रिया प्रेमात पडल्या आणि त्यांनी गाठ बांधण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्याचं ठरवलं आणि त्यांच्याशी संबंधित पारंपरिक विवाह पोशाखांची निवड केली. सोनेरी भरतकामासह पारंपारिक लाल लेहेंगा चोली परिधान केलेली अनुजा तर एंड्रियननं क्लासिक पांढरा वेडिंग गाउन निवडला होता.
इंडो-अमेरिकन लेस्बियन जोडपे आपण अनुजा अंकोला आणि अॅड्रिएन रोचेटी यांच्याबद्दल बोलत आहोत. अनुजा मूळची भारताची आहे, तर अॅड्रिन अमेरिकेची आहे. जेव्हा या दोन्ही स्त्रिया प्रेमात पडल्या आणि त्यांनी गाठ बांधण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्याचं ठरवलं आणि त्यांच्याशी संबंधित पारंपरिक विवाह पोशाखांची निवड केली. सोनेरी भरतकामासह पारंपारिक लाल लेहेंगा चोली परिधान केलेली अनुजा तर एंड्रियननं क्लासिक पांढरा वेडिंग गाउन निवडला होता.Esakal
इंडो-अमेरिकन समलिंगी जोडपे
प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी इंस्टाग्रामवर एका इंडो-अमेरिकन जोडप्याचे स्टायलिश फोटो शेअर केले होते. या जोडप्याने  नुकतेच लग्न केले होते. 
त्यांनी अत्यंत मोहक कपडे परिधान केले होते. डिझायनरने कॅसे फ्रान्सिस एस्पिनोझा आणि रुडी ई पोर्टोबॅन्को यांच्या मियामी येथील लग्नातील काही स्पष्ट फोटो शेअर केले. क्लासिक अशा बंदगळा सूटमध्ये हे दोघे उत्कृष्ट दिसत होते.
इंडो-अमेरिकन समलिंगी जोडपे प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी इंस्टाग्रामवर एका इंडो-अमेरिकन जोडप्याचे स्टायलिश फोटो शेअर केले होते. या जोडप्याने नुकतेच लग्न केले होते. त्यांनी अत्यंत मोहक कपडे परिधान केले होते. डिझायनरने कॅसे फ्रान्सिस एस्पिनोझा आणि रुडी ई पोर्टोबॅन्को यांच्या मियामी येथील लग्नातील काही स्पष्ट फोटो शेअर केले. क्लासिक अशा बंदगळा सूटमध्ये हे दोघे उत्कृष्ट दिसत होते. Esakal
भारत-पाक लेस्बियन जोडपे
पाकिस्तानी कलाकार संदास मलिक आणि मूळचे भारतातील अंजली चक्र गेल्या वर्षी एकत्र आले आणि त्यांनी त्यांची अनिव्हर्सरी साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी सुंदर वांशिक पोशाख घातलेले त्यांचे काही मोहक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. 
चित्रांमध्ये अंजली आणि संदास पावसाच्या दरम्यान छत्रीखाली उभे आहेत. त्यांनी पारंपारिक दक्षिण आशियाई पोशाख लेहेंगा आणि साडी परिधान केलेला आहे आणि  हेरिटेज इमारतीसमोर आहेत. या दोघांनी काही पारंपारिक दागिनेही घातले आहेत.
भारत-पाक लेस्बियन जोडपे पाकिस्तानी कलाकार संदास मलिक आणि मूळचे भारतातील अंजली चक्र गेल्या वर्षी एकत्र आले आणि त्यांनी त्यांची अनिव्हर्सरी साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी सुंदर वांशिक पोशाख घातलेले त्यांचे काही मोहक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. चित्रांमध्ये अंजली आणि संदास पावसाच्या दरम्यान छत्रीखाली उभे आहेत. त्यांनी पारंपारिक दक्षिण आशियाई पोशाख लेहेंगा आणि साडी परिधान केलेला आहे आणि हेरिटेज इमारतीसमोर आहेत. या दोघांनी काही पारंपारिक दागिनेही घातले आहेत.Esakal
शेरवानीमध्ये गे जोडपे 
सब्यासाचीने रोमित देब आणि वॉल्टर बॅडिलो यांच्या लग्नाची सुंदर छायाचित्रे शेअर केली. या जोडप्यानं स्पेनच्या अंडालुसिया प्रदेशातील राजधानी सेव्हिल येथे लग्न केले. 
या जोडप्याने पाच वर्षांपूर्वी लग्न केले, पण सब्यासाचीने त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केल्यानंतर आता इंटरनेटवर त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.
यात रोमितने हाऊस ऑफ सब्यासाचीची सोन्याची बटणे असलेली क्लासिक ब्लॅक शेरवानी घातली, तर वॉल्टरने काळ्या आणि सोनेरी रंगात भरतकाम केलेली कापडं निवडली आहेत.
शेरवानीमध्ये गे जोडपे सब्यासाचीने रोमित देब आणि वॉल्टर बॅडिलो यांच्या लग्नाची सुंदर छायाचित्रे शेअर केली. या जोडप्यानं स्पेनच्या अंडालुसिया प्रदेशातील राजधानी सेव्हिल येथे लग्न केले. या जोडप्याने पाच वर्षांपूर्वी लग्न केले, पण सब्यासाचीने त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केल्यानंतर आता इंटरनेटवर त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. यात रोमितने हाऊस ऑफ सब्यासाचीची सोन्याची बटणे असलेली क्लासिक ब्लॅक शेरवानी घातली, तर वॉल्टरने काळ्या आणि सोनेरी रंगात भरतकाम केलेली कापडं निवडली आहेत. Esakal
NRI समलिंगी जोडपे
अमेरिकेत राहणाऱ्या एका सुंदर NRI जोडप्याने नुकतेच हे सिद्ध केले आहे की समलिंगी विवाह देखील स्टायलिश असू शकतात. न्यू जर्सी स्थित जोडपे अमित शहा आणि आदित्य मदिराजू यांनी न्यू जर्सी अमेरिकेतील रॉबिन्सविले येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथे पारंपारिक समारंभात लग्न केले.यावेळी अमितने डिझायनरचा अभिविरा कुर्ता घातला होता, तर आदित्यने त्याच डिझायनरने सेट केलेला अमर्त्य कुर्ता घातला होता.
NRI समलिंगी जोडपे अमेरिकेत राहणाऱ्या एका सुंदर NRI जोडप्याने नुकतेच हे सिद्ध केले आहे की समलिंगी विवाह देखील स्टायलिश असू शकतात. न्यू जर्सी स्थित जोडपे अमित शहा आणि आदित्य मदिराजू यांनी न्यू जर्सी अमेरिकेतील रॉबिन्सविले येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथे पारंपारिक समारंभात लग्न केले.यावेळी अमितने डिझायनरचा अभिविरा कुर्ता घातला होता, तर आदित्यने त्याच डिझायनरने सेट केलेला अमर्त्य कुर्ता घातला होता.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.