दुपारच्या जेवणात 'हे' सहा पदार्थ खाताय? असे होतील परिणाम

दुपारी थोडी काळजी घेतलीत तर तुम्हाला काम करताना अधिक ताजतवानं वाटू शकेल.
Foods For Lunch
Foods For Lunch
Updated on

दुपारच्या जेवणात पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर, लोणचं, असे पदार्थ खाण्याकडे (Food) सर्वांचाच कल असतो. ऑफिसमध्ये डब्यातही असे पदार्थ नेले जातात. दुपारच्या जेवणात हे पदार्थ खाल्ले जातात. पण काही वेळा पोट भरत नाही. किंवा मग पार्टी असली की काहीतरी वेगळं खावसं वाटतं. अशावेळी काही पदार्थ तुम्ही खाल्लेत कि झोप (Sleep) यायला लागते. ऑफिसमध्ये (Office) काम सोडून झोपणं शक्य नसतं. अशावेळी काही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. दुपारी थोडी काळजी घेतलीत तर तुम्हाला काम करताना अधिक ताजतवानं वाटू शकेल.

1) व्हेजिटेबल सूप- सूपमध्ये कॅलरी खूप कमी असते तसेच ती पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. असे जरी असले तरी त्यात प्रोटीन अजिबात नसते. याचा अर्थ बाऊलभर सूप प्यायल्याने तुमचे पोट फारसे भरत नाही. प्रोटीन भूक कमी करते. त्यामुळे जास्त खायची इच्छा होत नाही. त्यामुळे जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्हाला सूप प्यायचेच असेल तर चिकन सूप प्या. कारण त्यात थोड्या प्रमाणात प्रोटीन असते.

२) फास्ट फूड- फास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात चरबी (फॅट) असते, त्यामुळे पोट लवकर भरते. पण त्याचबरोबर थकवा आणि आळसही येतो. त्यामुळे साहजिकच कामावर परिणाम होतो. त्यामुळे ऑफिसमध्ये असताना तर फास्ट फूड खाऊच नये.
२) फास्ट फूड- फास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात चरबी (फॅट) असते, त्यामुळे पोट लवकर भरते. पण त्याचबरोबर थकवा आणि आळसही येतो. त्यामुळे साहजिकच कामावर परिणाम होतो. त्यामुळे ऑफिसमध्ये असताना तर फास्ट फूड खाऊच नये.sakal
३) पास्ता- पास्तात रिफाईंड कार्ब असते. जे आरोग्यासाठी चांगले नसते. जर, दुपारी पास्ता खाल्लात तर तुम्हाला झोप येईल. जर तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करणार असाल तर पास्ता अजिबातच खाऊ नका. कारण तो खाल्ल्याने तुम्हाला झोप येईल.

४) ग्रीन ज्यूस - दुपारी ग्रीन ज्यूस पिण्याचा सल्ला अनेकजण देतात. पण, आहारतज्ज्ञ व्हिटनी स्टुअर्ट यांच्या मते, ग्रीन ज्यूस आरोग्यासाठी चांगले असते. पण दुपारी ते पिणे योग्य नाही. कारण दुपारच्या आहारात फायबर, प्रोटीन, कार्ब, आणि फॅट यांचे मिश्रण असलेले जेवण जेवावे. त्यामुळे पोट चांगले भरलेले राहते. त्यामुळे ग्रीन ज्यूस  शक्यतो पिऊ नका. पण प्यायचेच असेल तर, त्याबरोबर कॉम्पेल्क्स कार्ब फूड नक्की खा.

५) तळलेले पदार्थ - खराब तेलात असे काही पदार्थ तळले जातात. त्यामुळे पदार्थातील फॅट जास्त वाढते. तसेच त्यात कॅलरी कमी असते. जर हे पदार्थ खाल्ले तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तसेच आळसही येतो. त्यामुळे दूपारच्या जेवणात असे पदार्थ खाऊच नयेत.
५) तळलेले पदार्थ - खराब तेलात असे काही पदार्थ तळले जातात. त्यामुळे पदार्थातील फॅट जास्त वाढते. तसेच त्यात कॅलरी कमी असते. जर हे पदार्थ खाल्ले तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तसेच आळसही येतो. त्यामुळे दूपारच्या जेवणात असे पदार्थ खाऊच नयेत. Sakal
६) स्टोअऱ केलेले  सॅण्डवीच- मार्केटमध्ये आधीपासूनच तयार असलेले सॅण्डवीच मिळते. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होते. त्यात प्रिजर्व्हेटीव्हही मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे अंगात आळस येतो.
६) स्टोअऱ केलेले सॅण्डवीच- मार्केटमध्ये आधीपासूनच तयार असलेले सॅण्डवीच मिळते. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होते. त्यात प्रिजर्व्हेटीव्हही मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे अंगात आळस येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.