मंडणगडची वाटचाल आधुनिक शेतीकडे, यंत्राद्वारे भातशेतीची लागवड

मनुष्यबळाची वानवा असणाऱ्या मंडणगडमध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी आहे
konkan agricultural news mandangad
konkan agricultural news mandangad
Updated on
Summary

कृषी क्षेत्रात मंडणगड तालुक्यात प्रथमच भात लावणी यंत्राचा वापर करून भात लागवड करण्यात आली. ही सुरुवात तालुक्याच्या कृषी क्षेत्रासाठी महत्वाची असून मनुष्यबळाची वानवा असणाऱ्या मंडणगडमध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी आहे. तुळशी येथील शेतकरी राहुल देशमुख यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील शेतात याचे प्रात्यक्षिक घेतले. यासाठी कूबोटा कंपनी व तालुका कृषी विभागाने सहकार्य केले.

 १ एकर क्षेत्रासाठी सव्वा तास लागत असून यासाठी ८० ट्रे भाताची रोपे लागतात. यामध्ये बियाणांचा वापर कमी होतो.
१ एकर क्षेत्रासाठी सव्वा तास लागत असून यासाठी ८० ट्रे भाताची रोपे लागतात. यामध्ये बियाणांचा वापर कमी होतो.
मंडणगड तालुक्यातील कर्ती लोकसंख्या रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाल्याने शेती ओस पडली आहे. मनुष्यबळाची वानवा असल्याने शेतीचे क्षेत्र घटले आहे.
मंडणगड तालुक्यातील कर्ती लोकसंख्या रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाल्याने शेती ओस पडली आहे. मनुष्यबळाची वानवा असल्याने शेतीचे क्षेत्र घटले आहे.
मजुरीचा खर्च बचत व वेळेची बचत यामुळे होणार असून शेती क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
मजुरीचा खर्च बचत व वेळेची बचत यामुळे होणार असून शेती क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
मशीनची रचना अल्युमियम आणि प्लास्टिकमध्ये असल्याने गंज लागत नाही. कमी वेळेत जास्त काम होत असून शेतकऱ्याचे श्रम, आर्थिक आणि वेळेची बचत होते.

- अशोक ट्रॅक्टर, कुबोटा कंपनी
मशीनची रचना अल्युमियम आणि प्लास्टिकमध्ये असल्याने गंज लागत नाही. कमी वेळेत जास्त काम होत असून शेतकऱ्याचे श्रम, आर्थिक आणि वेळेची बचत होते. - अशोक ट्रॅक्टर, कुबोटा कंपनी
लावणी यंत्राचा वापर केल्यास शेती क्षेत्रात वाढ होईल. शेतकऱ्यांना जाणवणारी मनुष्यबळ कमतरता भरून निघणार असून यामुळे तालुक्यातील कृषी क्षेत्रात बदल घडून येईल. पडीक क्षेत्र लागवडीखाली येईल.

- विलास बावस्कर, कृषी सहाय्यक
लावणी यंत्राचा वापर केल्यास शेती क्षेत्रात वाढ होईल. शेतकऱ्यांना जाणवणारी मनुष्यबळ कमतरता भरून निघणार असून यामुळे तालुक्यातील कृषी क्षेत्रात बदल घडून येईल. पडीक क्षेत्र लागवडीखाली येईल. - विलास बावस्कर, कृषी सहाय्यक
कुबोटा कंपनीच्या सहकार्याने भात लावणी यंत्र उपलब्ध करण्यात आले. याचा अंनुभव खूपच सकारात्मक असून वेळेची बचत होत असून कामही जास्त होते. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे हे उपयुक्त ठरेल.

- राहुल देशमुख, प्रात्यक्षिक शेतकरी
कुबोटा कंपनीच्या सहकार्याने भात लावणी यंत्र उपलब्ध करण्यात आले. याचा अंनुभव खूपच सकारात्मक असून वेळेची बचत होत असून कामही जास्त होते. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे हे उपयुक्त ठरेल. - राहुल देशमुख, प्रात्यक्षिक शेतकरी
उखळणी, चिखळणी यासाठी लागणारे मनुष्यबळ यावर होणाऱ्या खर्चात कपात होवून पेरणी पासून लावणी पर्यंत मशीन द्वारे ७ ते ८ हजारांचा खर्च होतो.
उखळणी, चिखळणी यासाठी लागणारे मनुष्यबळ यावर होणाऱ्या खर्चात कपात होवून पेरणी पासून लावणी पर्यंत मशीन द्वारे ७ ते ८ हजारांचा खर्च होतो.
यावेळी कुबोटा कंपनीचे अशोक ट्रॅक्टर, कृषी सहाय्यक विलास बावस्कर, प्रसाद धामोरे, वैभव सितापुरे, शेतकरी राहुल देशमुख, समीर पारधी उपस्थित होते.
यावेळी कुबोटा कंपनीचे अशोक ट्रॅक्टर, कृषी सहाय्यक विलास बावस्कर, प्रसाद धामोरे, वैभव सितापुरे, शेतकरी राहुल देशमुख, समीर पारधी उपस्थित होते.
तुळशी येथील शेतकरी राहुल देशमुख यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील शेतात याचे प्रात्यक्षिक घेतले. यासाठी कूबोटा कंपनी व तालुका कृषी विभागाने सहकार्य केले.
तुळशी येथील शेतकरी राहुल देशमुख यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील शेतात याचे प्रात्यक्षिक घेतले. यासाठी कूबोटा कंपनी व तालुका कृषी विभागाने सहकार्य केले.
अशा परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा वापर वाढत असून भात लावणी यंत्राचा वापर हा तालुक्यासाठी आश्वासक म्हणावा लागेल.
अशा परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा वापर वाढत असून भात लावणी यंत्राचा वापर हा तालुक्यासाठी आश्वासक म्हणावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.