Photos: पैसा बोलता है! भरल्या खिशावर 'या' खेळाडूंचे IPLमध्ये झाले 'मनोमीलन'

Many Players Set Aside Rivalry in IPL
Many Players Set Aside Rivalry in IPL ESAKAL
Updated on

आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) लखनौ सुपर जायंट आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि दीपक हुड्डाने (Deepak Hood) आपली जुनी दुष्मनी (Rivalry) विसरून गळ्यात गळे घातले. या दोघांमध्ये बडोदा संघाकडून खेळताना वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता की दीपक हुड्डाने बडोदा संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पांड्या आणि हुड्डात दिलजमाई झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर आयपीएलच्या इतिहासातील अशाच वाद मिटवून गळ्यात गळे घालणाऱ्या जुन्या खेळाडूंच्या आठवणी ताज्या झाल्या.

हरभजन सिंगवर ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपौलू खेळाडू अँड्र्यु सायमंडने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून यांच्यात विस्तवही जात नव्हाता. मात्र या दोघांनी 2011 च्या आयपीएल हंगामात आपले मतभेद मिटवले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने यांच्यात मध्यस्थी केली होती.
हरभजन सिंगवर ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपौलू खेळाडू अँड्र्यु सायमंडने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून यांच्यात विस्तवही जात नव्हाता. मात्र या दोघांनी 2011 च्या आयपीएल हंगामात आपले मतभेद मिटवले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने यांच्यात मध्यस्थी केली होती. ESAKAL
अॅशेसमधील दुश्मनी आयपीएलमध्ये विसरून विक्रमी भागीदारी रचणाऱ्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची कहानीही रंजक आहे. अॅशेस मालिकेत एकमेकांना टशन देणारे हे खेळाडू सनरायझर्स हैदराबादकडून अनेक हंगाम धडाकेबाज सलामी देत होते. या दोघांचे ट्युनिंग पाहिले तर हे एकाच संघात खेळत असल्याचा भास नक्की होईल.
अॅशेसमधील दुश्मनी आयपीएलमध्ये विसरून विक्रमी भागीदारी रचणाऱ्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची कहानीही रंजक आहे. अॅशेस मालिकेत एकमेकांना टशन देणारे हे खेळाडू सनरायझर्स हैदराबादकडून अनेक हंगाम धडाकेबाज सलामी देत होते. या दोघांचे ट्युनिंग पाहिले तर हे एकाच संघात खेळत असल्याचा भास नक्की होईल. ESAKAL
हरभजनचे अनेक खेळाडूंबरोबर विशेष करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर वाद होते. हरभजन आणि कांगारूंचा कर्णधार रिकी पाँटिंग यांच्यात मैदानावर अनेकवेळा शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. मात्र 2013 च्या आयपीएल हंगामात पाँटिंग आणि हरभजन एकमेकांना असे काही मिठी मारत होते जसे यांच्यात कोणता वादच नव्हता.
हरभजनचे अनेक खेळाडूंबरोबर विशेष करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर वाद होते. हरभजन आणि कांगारूंचा कर्णधार रिकी पाँटिंग यांच्यात मैदानावर अनेकवेळा शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. मात्र 2013 च्या आयपीएल हंगामात पाँटिंग आणि हरभजन एकमेकांना असे काही मिठी मारत होते जसे यांच्यात कोणता वादच नव्हता. ESAKAL
मंकडिंग प्रकरणानंतर त्यावेळेचा पंजाब किंग्जचा फिरकीपटू आर. अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार बॅट्समन जोस बटलर यांच्यात शाब्दिक देवाणघेवाण झाली होती. त्यावेळी हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेला होता. पण काळाची चक्रे फिरली आणि यंदाच्या मेगा लिलावात अश्विन राजस्थान संघात दाखल झाला. त्यावेळी आता बटलर आणि अश्विन यांचे संबंध कसे असणार अशी चर्चा रंगली होती. मात्र बदलेल्या नियमांमुळे यांच्यातील वाद निवळण्यात मदत झाली. आता ते आनंदाने राजस्थानमध्ये ड्रेसिंग रूम शेअर करत आहेत.
मंकडिंग प्रकरणानंतर त्यावेळेचा पंजाब किंग्जचा फिरकीपटू आर. अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार बॅट्समन जोस बटलर यांच्यात शाब्दिक देवाणघेवाण झाली होती. त्यावेळी हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेला होता. पण काळाची चक्रे फिरली आणि यंदाच्या मेगा लिलावात अश्विन राजस्थान संघात दाखल झाला. त्यावेळी आता बटलर आणि अश्विन यांचे संबंध कसे असणार अशी चर्चा रंगली होती. मात्र बदलेल्या नियमांमुळे यांच्यातील वाद निवळण्यात मदत झाली. आता ते आनंदाने राजस्थानमध्ये ड्रेसिंग रूम शेअर करत आहेत. ESAKAL
बडोदा संघात असताना संघाचा कर्णधार कृणाल पांड्या आणि  व्यावसायिक खेळाडून म्हणून संघात असलेल्या दीपक हुड्डा यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी हा वाद खूप विकोपाला गेला होता. दोघेही खेळाडू एकमेकांची तोंडे पाहणार नाहीत असेच वाटले होते. मात्र आयपीएलने या दोघांच्यात दिलजमाई घडवून आणलीच. नुकत्याच झालेल्या लखनौ सुपर जायंट आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात कृणाल पांड्याने हुड्डाला चक्क मिठी मारून उचलून घेतल्याचे फोटो व्हायरल झाले.
बडोदा संघात असताना संघाचा कर्णधार कृणाल पांड्या आणि व्यावसायिक खेळाडून म्हणून संघात असलेल्या दीपक हुड्डा यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी हा वाद खूप विकोपाला गेला होता. दोघेही खेळाडू एकमेकांची तोंडे पाहणार नाहीत असेच वाटले होते. मात्र आयपीएलने या दोघांच्यात दिलजमाई घडवून आणलीच. नुकत्याच झालेल्या लखनौ सुपर जायंट आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात कृणाल पांड्याने हुड्डाला चक्क मिठी मारून उचलून घेतल्याचे फोटो व्हायरल झाले.ESAKAL

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.