दिग्गज कलाकार असलेल्या काही मालिकाही टीआरपी न मिळाल्याने लवकर बंद पडल्या.
छोट्या पडद्यावरील मराठी मलिका नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकतात.या सर्व मालिकांच्या कथा प्रेक्षकांना नेहमीच आपल्याशा वाटतात. मराठी मालिकांचे अनेक चाहते आहेत. अगदी दररोज न चुकता आपली आवडती मालिका पाहणारा प्रेक्षक वर्ग जास्त आहे. पण काही मालिकांनी मात्र प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले नाही. छोट्या पडद्यावर फ्लॉप ठरलेल्या मालिका कोणत्या ते पाहुयात..
लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू
लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही फक्त 149 एपिसोडमध्येच मालिकांच्या निर्मात्यांना ही सिरीयल बंद करावी लागली. या मालिकेमध्ये विजय आंदळकर आणि रुपाली झंकार यांनी प्रमुख भूमिका केली होती.
अग्गंबाई सूनबाई
‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेच्या घवघवीत यशानंतर अग्गंबाई सूनबाई ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही.
अग्निहोत्र 2
अग्निहोत्र 2 या मराठी मालिकेच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. या मालिकेचे फक्त 150 एपिसोड प्रदर्शित झाले.
आठशे खिडक्या नऊशे दारं
लॉकडाऊनच्या काळात अनेक मालिकांचे शूटिंग बंद करण्यात आले होते. अशा वेळी शूटिंग फ्रॉम होम ही नवी संकल्पना घेऊन आठशे खिडक्या नऊशे दारं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. कमी टीआरपीमुळे काही भागांनंतर ही मालिका बंद करण्यात आली.
प्रेमाचा गेम शेम टू शेम
लॉकडाऊच्या काळात प्रेमाचा गेम शेम टू शेम ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेचे फक्त 56 एपिसोडच प्रदर्शित झाले. प्रेक्षकांची पसंती न मिळाल्याने ही मालिका बंद करण्यात आली.
चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यामुळे 138 एपिसोडनंतर ही मालिका बंद करण्यात आली. मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.