या सेलिब्रिटींचे घटस्फोट ठरले सर्वात महागडे

त्यांनी घटस्फोटानंतर दिलेल्या पोटगीची खूप चर्चा झाली
बिल आणि मेलिंडा गेट्स
बिल आणि मेलिंडा गेट्स esakal
Updated on

लग्नाला (marriage) १० १५ वर्ष झाल्यानंतर घटस्फोट (divorce) घेणे अत्यंत सामान्य बाब झाली आहे. आजकाल अनेक सेलिब्रिटी लग्नाला २०-२५ वर्ष झाल्यानंतर घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यात घटस्फोटानंतर दिली जाणारी पोटगी हा चर्चेचा विषय ठरतो आहे. २०२१ या वर्षी बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा घटस्फोट सर्वात महागडा ठरला. आणखीही काही सेलिब्रिटींचे घटस्फोट महागडे होते.

लग्नाच्या २७ वर्षानंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी ३ मे रोजी घटस्फोटाचा निर्णय घेतला. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटले. Twitter वर ही बातमी देताना त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या फाऊंडेशनचे कार्य सोबत मिळून करू. मेलिंडाला किती पोटगी मिळाली हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, त्यांचा घटस्फोट सर्वाधिक चर्चिला गेला.

जेफ बेझोस - मॅकेन्झी बेझोस - $38 अब्ज- 
बिल आणि मेलिंडा पाठोपाठ Amazonचा फाऊंडर जेफ बेझोस - मॅकेन्झी बेझोस यांच्या २०१९ साली झालेल्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली.त्यांच्या घटस्फोटाच्या मंजुरीनंतर कंपनीच्या स्टॉकपैकी ४ टक्के म्हणजेच 19.7 दशलक्ष शेअर्स मॅकेन्झीच्या नावावर करण्यात आले आहेत. तर जेफने मॅकेन्झीला $38 अब्ज पोटगी दिली. त्यामुळे फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या महिला अब्जाधीशांच्या यादीत मॅकेन्झी चौथ्या स्थानावर होती.
जेफ बेझोस - मॅकेन्झी बेझोस - $38 अब्ज- बिल आणि मेलिंडा पाठोपाठ Amazonचा फाऊंडर जेफ बेझोस - मॅकेन्झी बेझोस यांच्या २०१९ साली झालेल्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली.त्यांच्या घटस्फोटाच्या मंजुरीनंतर कंपनीच्या स्टॉकपैकी ४ टक्के म्हणजेच 19.7 दशलक्ष शेअर्स मॅकेन्झीच्या नावावर करण्यात आले आहेत. तर जेफने मॅकेन्झीला $38 अब्ज पोटगी दिली. त्यामुळे फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या महिला अब्जाधीशांच्या यादीत मॅकेन्झी चौथ्या स्थानावर होती.esakal
रुपर्ट मर्डोक - मारिया टॉर्व - $1.7 अब्ज- 
रुपर्ट मर्डोक - मारिया टॉर्व यांच्या लग्नाला ३१ वर्ष झाल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांना तीन मुले आहेत. मारियाला घटस्फोटानंतर  $1.7 अब्ज मिळाल्याचे सांगितले जाते. घटस्फोट झाल्यावर 17 दिवसांनी मर्डोकने वेंडी डेंगशी लग्न केले, तर इकॉनॉमिक टाइम्सनुसार सहा महिन्यांनंतर टॉर्व्हने विल्यम मानशी लग्न केले.
रुपर्ट मर्डोक - मारिया टॉर्व - $1.7 अब्ज- रुपर्ट मर्डोक - मारिया टॉर्व यांच्या लग्नाला ३१ वर्ष झाल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांना तीन मुले आहेत. मारियाला घटस्फोटानंतर $1.7 अब्ज मिळाल्याचे सांगितले जाते. घटस्फोट झाल्यावर 17 दिवसांनी मर्डोकने वेंडी डेंगशी लग्न केले, तर इकॉनॉमिक टाइम्सनुसार सहा महिन्यांनंतर टॉर्व्हने विल्यम मानशी लग्न केले.esakal
अँजेलिना जोली -ब्रॅड पिट - $100 दशलक्ष- 
लग्नाला ११ वर्ष झाल्यानंतर अॅंजेलिना आणि ब्रॅडने विभक्त होण्याचा सप्टेंबर २०१६ साली निर्णय  घेतला. या जोडप्याला ६ मुले आहेत. मुलांसाठी तडजोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना $1 दशलक्षपेक्षा जास्त कायदेशीर शुल्क भरावे लागले.  ब्रॅडने अँजेलियाला $100 दशलक्ष ऑफर दिल्याचे मानले जाते.
अँजेलिना जोली -ब्रॅड पिट - $100 दशलक्ष- लग्नाला ११ वर्ष झाल्यानंतर अॅंजेलिना आणि ब्रॅडने विभक्त होण्याचा सप्टेंबर २०१६ साली निर्णय घेतला. या जोडप्याला ६ मुले आहेत. मुलांसाठी तडजोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना $1 दशलक्षपेक्षा जास्त कायदेशीर शुल्क भरावे लागले. ब्रॅडने अँजेलियाला $100 दशलक्ष ऑफर दिल्याचे मानले जाते. esakal
टायगर वूड्स - एलिन नॉर्डेग्रेन - $110 दशलक्ष-
सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने २०१० साली घटस्फोट घेतला. टायगरची असलेली अनेक अफेअर्स त्याला कारणीभूत होती. हफपोस्टच्या म्हणण्यानुसार घटस्फोटाची रक्कम $110 दशलक्ष इतकी असू शकते. एप्रिल २०११ मध्ये एलिनने मुलांचा संपूर्ण ताबा तिच्याकडे असावा यासाठी $750 दशलक्षची मागणी केली.
टायगर वूड्स - एलिन नॉर्डेग्रेन - $110 दशलक्ष- सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने २०१० साली घटस्फोट घेतला. टायगरची असलेली अनेक अफेअर्स त्याला कारणीभूत होती. हफपोस्टच्या म्हणण्यानुसार घटस्फोटाची रक्कम $110 दशलक्ष इतकी असू शकते. एप्रिल २०११ मध्ये एलिनने मुलांचा संपूर्ण ताबा तिच्याकडे असावा यासाठी $750 दशलक्षची मागणी केली.esakal
मायकेल जॉर्डन - जुआनिता वानोय - $168 दशलक्ष-
घटस्फोटानंतर, वानॉयला $168m रक्कम मिळाली,  मायकेल जॉर्डन आणि जुआनिता वानॉय यांनी लग्गाला २० वर्ष झाल्यावर 2006 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याआधी चार वर्षे त्यांचे मतभेद सोडवण्याचा प्रयत्न केला. जॉर्डनने त्यांच्या कायदेशीर फीसाठी $2.1 दशलक्ष दिले.
मायकेल जॉर्डन - जुआनिता वानोय - $168 दशलक्ष- घटस्फोटानंतर, वानॉयला $168m रक्कम मिळाली, मायकेल जॉर्डन आणि जुआनिता वानॉय यांनी लग्गाला २० वर्ष झाल्यावर 2006 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याआधी चार वर्षे त्यांचे मतभेद सोडवण्याचा प्रयत्न केला. जॉर्डनने त्यांच्या कायदेशीर फीसाठी $2.1 दशलक्ष दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.