दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलन; घोषणाबाजीने दुमदुमला परिसर

दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलन
दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलनSakal media
Updated on
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि विमानतळाला नाव देण्याबाबत सरकारने एका महिन्यात निर्णय न घेल्यास एक लाख आंदोलक रस्त्यावर उतरतील आणि आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कृती समितीने दिला. महिलांची उपस्थिती लक्षणीय आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता पुरे झाले. दिबांशिवाय कोण उरले, विमानतळाला दुसरे नाव शक्‍यच नाही, अशा स्‍वरूपातील घोषणा यावेळी देण्यात आल्‍या.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि विमानतळाला नाव देण्याबाबत सरकारने एका महिन्यात निर्णय न घेल्यास एक लाख आंदोलक रस्त्यावर उतरतील आणि आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कृती समितीने दिला. महिलांची उपस्थिती लक्षणीय आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता पुरे झाले. दिबांशिवाय कोण उरले, विमानतळाला दुसरे नाव शक्‍यच नाही, अशा स्‍वरूपातील घोषणा यावेळी देण्यात आल्‍या.Sakal media
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील  यांचे नाव देण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या विमानतळ काम बंद आंदोलनात हजारोंच्या संख्येने प्रकल्‍पग्रस्‍त सहभागी झाले होते.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या विमानतळ काम बंद आंदोलनात हजारोंच्या संख्येने प्रकल्‍पग्रस्‍त सहभागी झाले होते.sakal media
आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्‍तांच्या नेत्यांनी केलेल्या लांबलचक भाषणांमुळे काही आंदोलक नाराज झाले होते. भाषणबाजी कमी करा आणि ठोस भूमिका घ्या, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्‍तांच्या नेत्यांनी केलेल्या लांबलचक भाषणांमुळे काही आंदोलक नाराज झाले होते. भाषणबाजी कमी करा आणि ठोस भूमिका घ्या, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. sakal media
आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कृती समितीचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कृती समितीचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. sakal media
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी ११९ पोलिस अधिकारी, ९०७ अंमलदार, एक एसआरपी बिट विमानतळ परिसरात तैनात करण्यात आले होते. आंदोलनात पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील जवळपास अडीच हजारांहून अधिक आंदोलक सामील झाल्याचा अंदाज पोलिस विभागाच्या गोपनीय कक्षाकडून वर्तवण्यात आला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी ११९ पोलिस अधिकारी, ९०७ अंमलदार, एक एसआरपी बिट विमानतळ परिसरात तैनात करण्यात आले होते. आंदोलनात पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील जवळपास अडीच हजारांहून अधिक आंदोलक सामील झाल्याचा अंदाज पोलिस विभागाच्या गोपनीय कक्षाकडून वर्तवण्यात आला.Sakal media
सकाळी सुरू झालेल्या आंदोलनप्रसंगी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता; तर आंदोलकांच्या भीतीने सिडकोने रविवारपासूनच विमानतळाचे सुरू असलेले काम बंद ठेवले होते.
 
(सर्व छायाचित्रे - सत्यवान वास्कर )
सकाळी सुरू झालेल्या आंदोलनप्रसंगी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता; तर आंदोलकांच्या भीतीने सिडकोने रविवारपासूनच विमानतळाचे सुरू असलेले काम बंद ठेवले होते. (सर्व छायाचित्रे - सत्यवान वास्कर )Sakal media

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.