हुतात्मा दिनीच आधारवड हरपला; सीमावासियांनी एनडींना वाहिली श्रद्धांजली

प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे सीमावासियांचे मोठे नुकसान
beglaum
beglaumesakal
Updated on
Summary

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे अकरा जानेवारीपासून येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाची बातमी कळताच बेळगावसह सीमाभागात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बातमी कळताच अनेकजणांनी कोल्हापूरला रवाना झाले आहेत.

ऐन हुतात्मा दिनीच सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच बेळगावसह सीमाभागात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी कळताच अनेकजणांनी कोल्हापूरला रवाना झाले आहेत.

सीमावासियांचा आधारवड हरपल्याच्या प्रतिक्रिया मराठी भाषिकांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी ज्या ज्या वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आंदोलने करण्यात आली. त्यावेळी एन डी पाटील हे आघाडीवर होते.

सीमावासियांना त्यांचा आधार नेहमीच होता. बेळगाव नामांतर मोर्च्यात त्यांनी सहभाग घेतला होता.

गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती तरीही त्यांनी दोन-तीन कार्यक्रमाला व्हिलचेअरवरुन येत मराठी भाषिकांना मार्गदर्शन केले होते.

भाषण ऐकण्यासाठी नेहमीच मराठी भाषिक गर्दी करत होते. तसेच सीमा लढ्यातील आंदोलनामुळे त्यांना अनेकदा अटकही करण्यात आली होती.

शेवटच्या क्षणापर्यंत मराठी भाषिकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न सुरू होते.

हुतात्मा चौक येथे सोमवारी सकाळी हुतात्म्यांना अभिवादन करताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी एन.डी.पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली होती.

तेव्हापासून पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न मराठी भाषिकांतून केला जात होता.

मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर सीमावासीय स्तब्ध झाले असून अनेकजण कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.