PHOTO : कोकणात दोन वर्षांनी दिसले पेंटेड लेडी फुलपाखरू

कुर्धेसडा येथे आढळ; ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका खंड वगळता सर्वत्र संचार
painted lady butterfly in konkan
painted lady butterfly in konkanGoogle
Updated on
Summary

सन २०१९ नंतर गेली २ वर्षे रत्नागिरी आणि परिसरात हे फुलपाखरू दिसलंच नव्हतं. यावर्षी पुन्हा दिसलंय. ते कुर्धेसडा येथे पेंटेड लेडी जगातील सर्वात परिचित फुलपाखरांपैकी एक आहे, असे रत्नागिरीतील कुर्धे, येथील हौशी फोटोग्राफर आदित्य भट यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून येथील कातळसड्यावर टिपले.

रत्नागिरीतील फुलपाखरू संशोधक मंगल राणे व नेत्रा पालकर-आपटे यांनी दुर्लभ झालेल्या फुलपाखराविषयी माहिती दिली. हे फुलपाखरू जवळजवळ सर्व खंड आणि हवामानात आढळते.
रत्नागिरीतील फुलपाखरू संशोधक मंगल राणे व नेत्रा पालकर-आपटे यांनी दुर्लभ झालेल्या फुलपाखराविषयी माहिती दिली. हे फुलपाखरू जवळजवळ सर्व खंड आणि हवामानात आढळते. Google
पेंटेड लेडी फुलपाखरे ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडात राहतात. सर्वांना कुरणापासून रिकाम्या जागेपर्यंत सर्वत्र पेंटेड लेडी फुलपाखरू सापडतील.
पेंटेड लेडी फुलपाखरे ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडात राहतात. सर्वांना कुरणापासून रिकाम्या जागेपर्यंत सर्वत्र पेंटेड लेडी फुलपाखरू सापडतील. Google
ते फक्त उबदार हवामानात राहत असले तरीही पेंटेड लेडी फुलपाखरू बहुतेकदा वसंत ऋतु आणि शरद ऋतूमध्ये थंड प्रदेशात स्थलांतर करतात. याच्या जगभरातील संचाराचे प्रमुख कारण म्हणजे यांचं खाद्य झाड.
ते फक्त उबदार हवामानात राहत असले तरीही पेंटेड लेडी फुलपाखरू बहुतेकदा वसंत ऋतु आणि शरद ऋतूमध्ये थंड प्रदेशात स्थलांतर करतात. याच्या जगभरातील संचाराचे प्रमुख कारण म्हणजे यांचं खाद्य झाड. Google
थिसल या प्रकारच्या रानटी झाडांवर ही फुलपाखरे आपला सुरवंट व्यवस्थेतील काळ व्यतीत करतात आणि याच झाडाची पाने खातात. अशा प्रकारची रानझुडपे जगभर सापडतात आणि म्हणून त्यांच्यावर वाढणारे पेंटेड लेडी फुलपाखरुसुद्धा जगभर सापडते.
थिसल या प्रकारच्या रानटी झाडांवर ही फुलपाखरे आपला सुरवंट व्यवस्थेतील काळ व्यतीत करतात आणि याच झाडाची पाने खातात. अशा प्रकारची रानझुडपे जगभर सापडतात आणि म्हणून त्यांच्यावर वाढणारे पेंटेड लेडी फुलपाखरुसुद्धा जगभर सापडते. Google
स्थलांतर करताना ही फुलपाखरे जमिनीपासून खूप उंच उडत नाहीत. स्थलांतर होताना मोठ्या संख्येच्या थव्याने होते.
स्थलांतर करताना ही फुलपाखरे जमिनीपासून खूप उंच उडत नाहीत. स्थलांतर होताना मोठ्या संख्येच्या थव्याने होते. Google
पेंटेड लेडी फुलपाखरांचे नर आपली हद्द स्वत:च आखून घेतात आणि त्याची राखणही करतात.
पेंटेड लेडी फुलपाखरांचे नर आपली हद्द स्वत:च आखून घेतात आणि त्याची राखणही करतात. Google
मादी पेंटेड लेडी गोरखमुंडी आणि याच प्रकारातील रानझुडपांवर अंडी घालते. जाडसर पानांचे हे झुडूप पाणथळ ठिकाणी हमखास आढळते.
मादी पेंटेड लेडी गोरखमुंडी आणि याच प्रकारातील रानझुडपांवर अंडी घालते. जाडसर पानांचे हे झुडूप पाणथळ ठिकाणी हमखास आढळते. Google
अंड्यामधून बाहेर येणारे सुरवंट ही पाने खातात. शिवाय या पानांमध्ये स्वत:साठी रेशमी धाग्यांचे लेपनही बनवतात. या लेपनामध्ये बसून स्वत:चा बचाव करतात.
अंड्यामधून बाहेर येणारे सुरवंट ही पाने खातात. शिवाय या पानांमध्ये स्वत:साठी रेशमी धाग्यांचे लेपनही बनवतात. या लेपनामध्ये बसून स्वत:चा बचाव करतात. Google
 सुरवंटापासून फुलपाखरू व्हायला थंड प्रदेशात जवळपास दोन महिने लागतात, तर उबदार वातावरणात हीच वाढ दीड महिन्यात पूर्ण होते.
सुरवंटापासून फुलपाखरू व्हायला थंड प्रदेशात जवळपास दोन महिने लागतात, तर उबदार वातावरणात हीच वाढ दीड महिन्यात पूर्ण होते. Google

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.