वारी ते महाराष्ट्रदर्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफी

'छायाचित्रण माझ्यासाठी ऑक्सिजन आहे, कुणी काहीही म्हटलं तरी मी फोटोग्राफी सोडू शकत नाही'
वारी ते महाराष्ट्रदर्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफी
Updated on
Summary

सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राचे लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्याविषयी सुरु असणाऱ्या चर्चेंकडे आहे. व्यंगचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना राजकारणापेक्षा फोटोग्राफीची आवड अधिक आहे. फोटोग्राफीची नितांत आवड असल्याने उद्धव ठाकरे 40 वर्षे राजकारणापासून दूर राहिल्याचे बोलले जाते. यावरूनच त्यांची छायाचित्रणाची ओढ दिसून येते. छायाचित्रण माझ्यासाठी ऑक्सिजन आहे. कुणी काहीही म्हटलं तरी मी फोटोग्राफी सोडू शकत नाही, असं ते एकदा पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले होते. सध्याच्या घडीला राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. राज्याच राजकारण सत्तानाट्यानं रंगलं आहे. दरम्यान, यात आठवण होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीची. त्यांनी टिपलेले असे काही निवडक आणि प्रसिद्ध छायाचित्र आता आपण पाहणार आहोत... (photography of CM Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांना लहानपणापासून फोटोग्राफीची आवड आहे. वन्यजीव आणि निसर्ग छायाचित्रण हे त्यांचे आवडते विषय आहेत. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनातून मिळालेले पैसे ते शेतकरी आणि गरजूंच्या मदतीसाठी देतात.

ठाकेर यांनी त्यांच्या छायाचित्रांचा संग्रह ‘महाराष्ट्र देशा’ या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केला आहे. या पुस्तकात महाराष्ट्रातील 27 मोठ्या किल्ल्यांचे हवाई दृश्य टिपलेली आहेत. यात शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड, विशाळ गड, पुरंदर, दौलताबाद हे किल्ले आहेत. पुस्तकात राज्यातील प्रमुख मंदिरे आणि दर्ग्यांचीही छायाचित्रेही आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आकाशातून ही छायाचित्रे काढण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी घेतली होती. ही सर्व छायाचित्रे हेलिकॉप्टरने उंचीवरून घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे असे रूप जगासमोर मांडणाऱ्या उद्धव यांनी ‘दुर्गप्रेमी संघटने'ची स्थापन केली आहे. याशिवाय उद्धव यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारी यात्रेची हवाई छायाचित्रेही काढली आहेत.

विसापूर किल्ला
विसापूर किल्ला
पुरंदर किल्ला
पुरंदर किल्ला
रायगड किल्ला
रायगड किल्ला
पंढरपूरच्या वारी यात्रेदरम्यान काढलेले हवाई छायाचित्र.. रिंगण दरम्यानचा भाविकांचे छायाचित्र..

उद्धव यांनी सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही कॅमेऱ्यात कैद केले आहे.

केरळच्या समुद्रकिनारी कलारीपयट्टू सादर करताना कलाकारांचे टिपलेले छायाचित्र...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()