आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्र्वादी आणि शिवसेनेवर तुफान फटकेबाजी केली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र, 1999 ला ज्यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे राज यांनी सांगितले. संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.Sakal