Ram Navami 2023 : रामायणातून शिका Financial Planing

तब्येतीची काळजी घ्या आणि आपला आरोग्य विमा आजच करून घ्या.
Ram Navami 2023
Ram Navami 2023esakal
Updated on

आपले आयुष्य सुरक्षित ठेवा. -

तुम्ही काही लक्ष्मण नाही, ज्याच्यासाठी हनुमान संजीवनी घेऊन येईल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आणि आपला आरोग्य विमा आजच करून घ्या.

आपले बजेट आखा. - आपल्या खर्चासाठी एक लक्ष्मणरेखा आखून घ्या. ऑनलाइन डील्स आणि डिस्काऊंटच्या मोहाने ती ओलांडाल तर मग लंका अटळ आहे. गरज आणि इच्छा यातील फरक ओळ
आपले बजेट आखा. - आपल्या खर्चासाठी एक लक्ष्मणरेखा आखून घ्या. ऑनलाइन डील्स आणि डिस्काऊंटच्या मोहाने ती ओलांडाल तर मग लंका अटळ आहे. गरज आणि इच्छा यातील फरक ओळesakal
आकस्मिक निधी
ध्यानीमनी नसताना आपलं राजेशाही आयुष्य सोडून रामाला वनवासात जावं लागलं. मात्र इतक्या सहज आयुष्यात इतका मोठा बदल करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. जे रामाला साधलं ते आपल्याला साधेल असं नव्हे. त्यामुळे अचानक येणाऱ्या आपत्ती, बदलांकरता काही रकमेची तरतूद केलेली बरी.
आकस्मिक निधी ध्यानीमनी नसताना आपलं राजेशाही आयुष्य सोडून रामाला वनवासात जावं लागलं. मात्र इतक्या सहज आयुष्यात इतका मोठा बदल करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. जे रामाला साधलं ते आपल्याला साधेल असं नव्हे. त्यामुळे अचानक येणाऱ्या आपत्ती, बदलांकरता काही रकमेची तरतूद केलेली बरी.esakal
सहनशील व्हा. दीर्घकालीन परिणामांचा विचार करा.
यशाचा कुठलाही शॉर्ट कट नसतो. चौदा वर्षांच्या वनवासात रामाने काय भोगलं नाही. आनंद, दु:ख, भीती, क्रोध अनेक भावनांचं दर्शन झालं. या प्रवासात अनेक चढउतार आले. रावणाने सीतेचं हरण केलं. मात्र राम या सगळ्यात अचल राहिले. ते दु:खाने वेडेपिसे होऊन कर्तव्य विसरले नाहीत. परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न केले मात्र ती आपल्या मनासारखी होण्यासाठी पुरेशी वाटही पाहिली. लक्षात ठेवा यश मिळण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी सततचे प्रयत्न, कष्ट आवश्यक असतात. त्यामुळे बऱ्याच काळाकरता गुंतवणूक करण्याची तयारी ठेवा. मग ती पैशांची असेल श्रमाची असेल वा चिकाटीची.
सहनशील व्हा. दीर्घकालीन परिणामांचा विचार करा. यशाचा कुठलाही शॉर्ट कट नसतो. चौदा वर्षांच्या वनवासात रामाने काय भोगलं नाही. आनंद, दु:ख, भीती, क्रोध अनेक भावनांचं दर्शन झालं. या प्रवासात अनेक चढउतार आले. रावणाने सीतेचं हरण केलं. मात्र राम या सगळ्यात अचल राहिले. ते दु:खाने वेडेपिसे होऊन कर्तव्य विसरले नाहीत. परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न केले मात्र ती आपल्या मनासारखी होण्यासाठी पुरेशी वाटही पाहिली. लक्षात ठेवा यश मिळण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी सततचे प्रयत्न, कष्ट आवश्यक असतात. त्यामुळे बऱ्याच काळाकरता गुंतवणूक करण्याची तयारी ठेवा. मग ती पैशांची असेल श्रमाची असेल वा चिकाटीची.esakal
चतुराईने सल्ले निवडा
कैकयीने मंथरेचा सल्ला घेतला आणि त्याचा परिणाम काय झाला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. अडचणी आल्या, नाती ढासळली. कुटुंब विखुरलं आणि मग सगळं भलंमोठं रामायण घडलं. 
झटपट श्रीमंती मिळवून देणाऱ्या, सो कॉल्ड फायद्याच्या वगैरे ऑफर्स आणि त्या देणाऱ्या व्यक्तींपासून सावधच राहा. सल्लागाराच्या वेशातले चोरच असतात ते.
चतुराईने सल्ले निवडा कैकयीने मंथरेचा सल्ला घेतला आणि त्याचा परिणाम काय झाला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. अडचणी आल्या, नाती ढासळली. कुटुंब विखुरलं आणि मग सगळं भलंमोठं रामायण घडलं. झटपट श्रीमंती मिळवून देणाऱ्या, सो कॉल्ड फायद्याच्या वगैरे ऑफर्स आणि त्या देणाऱ्या व्यक्तींपासून सावधच राहा. सल्लागाराच्या वेशातले चोरच असतात ते. esakal
 चिकाटीने गंगाजळी जमवा - राम, सीता आणि लक्ष्मणाने अयोध्या सोडली तेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हतं. पण पुढच्या चौदा वर्षांत त्यांनी वानरसेना उभारली, आपल्या चांगल्या वागणुकीने माणसं जोडली आणि रावणाला हरवून दाखवलं. अशाप्रकारे वस्तू, माणसं जोडण्यासाठी शांतपणा आवश्यक असतो. सहनशीलता लागते. आर्थिक व्यवहार करतानाही धीर धरून पै न पै जमा केली, माणसं पारखून गुंतवणूक केली तर भविष्यकाळात येणाऱ्या मंदीशी लढणे सुकर होते.
चिकाटीने गंगाजळी जमवा - राम, सीता आणि लक्ष्मणाने अयोध्या सोडली तेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हतं. पण पुढच्या चौदा वर्षांत त्यांनी वानरसेना उभारली, आपल्या चांगल्या वागणुकीने माणसं जोडली आणि रावणाला हरवून दाखवलं. अशाप्रकारे वस्तू, माणसं जोडण्यासाठी शांतपणा आवश्यक असतो. सहनशीलता लागते. आर्थिक व्यवहार करतानाही धीर धरून पै न पै जमा केली, माणसं पारखून गुंतवणूक केली तर भविष्यकाळात येणाऱ्या मंदीशी लढणे सुकर होते.esakal
शिस्त बाणवा - प्रभू रामाने जीवनात योग्य, जबाबदार आणि शिस्तबद्ध होण्यासाठी "धर्म" पाळला. हेच आपल्यालाही लागू होतं. आर्थिक शिस्त असलेल्या आयुष्यासाठी  विवेकाने बचत करा. काळजीपूर्वक खर्च करा आणि हुशारीने गुंतवणूक करा.
शिस्त बाणवा - प्रभू रामाने जीवनात योग्य, जबाबदार आणि शिस्तबद्ध होण्यासाठी "धर्म" पाळला. हेच आपल्यालाही लागू होतं. आर्थिक शिस्त असलेल्या आयुष्यासाठी विवेकाने बचत करा. काळजीपूर्वक खर्च करा आणि हुशारीने गुंतवणूक करा. esakal
पाटी कोरी करा आणि पुन्हा श्रीगणेशा करा - १४ वर्षांचा वनवास संपला. रावणाचा पराभव झाला. सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. अगदी असंच आपण आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेतले असतील तर ते समजून घ्या. चुकांपासून धडे जरुर घ्या पण चुका आणि त्यांच्या आठवणी उगाळत बसू नका. पाटी कोरी करा आणि पुढच्या कार्यवाहीला लागा. नंतरचे निर्णय नीट अभ्यास करून घ्या आणि आपली आर्थिक गाडी रुळावर आणा.
पाटी कोरी करा आणि पुन्हा श्रीगणेशा करा - १४ वर्षांचा वनवास संपला. रावणाचा पराभव झाला. सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. अगदी असंच आपण आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेतले असतील तर ते समजून घ्या. चुकांपासून धडे जरुर घ्या पण चुका आणि त्यांच्या आठवणी उगाळत बसू नका. पाटी कोरी करा आणि पुढच्या कार्यवाहीला लागा. नंतरचे निर्णय नीट अभ्यास करून घ्या आणि आपली आर्थिक गाडी रुळावर आणा. esakal
कर्मावर विश्वास ठेवा. - चांगली कर्म केलीत तर त्याची फळं मिळणार आहेतच. तेव्हा कर्म करत राहा.
कर्मावर विश्वास ठेवा. - चांगली कर्म केलीत तर त्याची फळं मिळणार आहेतच. तेव्हा कर्म करत राहा.esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.