पाहा, बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान

पाहा, बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान
पाहा, बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान
पाहा, बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थानCanva
Updated on
Summary

रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हेमाडपंती वास्तुशिल्पाचा व दगडीकामाचा अप्रतिम आविष्कार आहे.

पांगरी (सोलापूर) : सोलापूर (Solapur) जिल्ह्यालगत येडशी (ता. जि. उस्मानाबाद) पासून तीन किलोमीटर अंतरावर व पांगरी (ता. बार्शी) पासून 10 किलोमीटर अंतरावर बालाघाट पर्वतरांगांच्या (Balaghat mountain) कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान (Ramling Temple). पर्यटकांना (Tourists) एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला देणारा म्हणून परिसर म्हणून नावारूपास येत आहे. रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हेमाडपंती वास्तुशिल्पाचा व दगडीकामाचा अप्रतिम आविष्कार आहे. श्रावणात सर्वत्र हिरवळ असते अन्‌ या ठिकाणची माकडांची वर्दळ विशेष लक्ष वेधून घेते. येथील धबधबा (Waterfall) हे भाविकांचे व पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत असते. प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या शोधासाठी फिरत असताना जटायू पक्ष्याचे व रावणाचे युद्ध या रामलिंग (Ramling) ठिकाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युद्धानंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायूला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले. ते पाणी जटायू पक्ष्याला पाजले. तेथेच त्यांनी लिंगाची स्थापना करून शिवआराधना केली, अशी आख्यायिका आहे. मंदिर व परिसरात अनेक वर्षांपासून माकडांचे वास्तव्य आहे. मंदिराच्या सभोवती अडीच हजार हेक्‍टर परिसर वनखात्याच्या (Forest Department) देखरेखीखाली आहे. हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे बाजूच्या जंगलात मोर, ससे, हरीण, लांडगे, रानडुक्कर, तरस यांसह विविध प्राणी व पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. या परिसरातील विविध दुर्मिळ औषधी वनस्पती हे जंगलाचे वैशिष्ट्य आहे.

येथील मुख्य आकर्षण धबधबा..
येथील मुख्य आकर्षण धबधबा..
मंदिर परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून, येणारे अनेक भाविक माकडांना केळी, फुटाणे, पेढे यांसारखे पदार्थ देऊन आनंद व्यक्त करत असतात.
मंदिर परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून, येणारे अनेक भाविक माकडांना केळी, फुटाणे, पेढे यांसारखे पदार्थ देऊन आनंद व्यक्त करत असतात.
निसर्गाच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान
निसर्गाच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान
श्रीक्षेत्र रामलिंग मंदिरातील पिंड व मूर्ती
श्रीक्षेत्र रामलिंग मंदिरातील पिंड व मूर्ती
प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी बाण मारून पाणी काढले अन्‌ जटायू पक्ष्याला पाजले व शिवआराधना केली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी बाण मारून पाणी काढले अन्‌ जटायू पक्ष्याला पाजले व शिवआराधना केली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यानंतर दिसणारे मंदिर.
मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यानंतर दिसणारे मंदिर.
मंदिरास वळसा घालून वाहणारी नदी.
मंदिरास वळसा घालून वाहणारी नदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.