vegetables : पावसाचा परिणाम, रानभाज्यांचे प्रमाण झाले कमी

रानभाजीने आपले आरोग्य चांगले राहते, त्यामुळे पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या खाव्यात.
vegetables
vegetables
Updated on
Summary

पावसाळा सुरू होताच माळरानावर, शेताच्या गवती बांधावर तसेच कुरणात हिरव्यागार पालेभाज्यांचे दर्शन होत असते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण असल्याने या भाज्यांचा कंदलगाव परिसरात खच लागला होता; मात्र यंदा पाऊस लागला; पण प्रमाण तुरळक असल्याने रानभाज्यांचे दर्शन कमी होत असल्याचे चित्र आहे...,

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण असल्याने या भाज्यांचा कंदलगाव परिसरात खच लागला होता.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण असल्याने या भाज्यांचा कंदलगाव परिसरात खच लागला होता.
मात्र यंदा पाऊस लागला; पण प्रमाण तुरळक असल्याने रानभाज्यांचे दर्शन कमी होत असल्याचे चित्र आहे.
मात्र यंदा पाऊस लागला; पण प्रमाण तुरळक असल्याने रानभाज्यांचे दर्शन कमी होत असल्याचे चित्र आहे.
कंदलगाव तलाव, डोंगर, सृष्टी पार्क, माने माळ खड्ड्यांचा माळ, पालकोबा डोंगर या परिसरात रानभाज्या मुबलक प्रमाणावर असल्याने कोल्हापूर शहर, उपनगरासह स्थानिकांची या भाज्या गोळा करण्यासाठी भटकंटी असायची; मात्र यावर्षी तुरळक पावसाने या रानभाज्या उगवल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

काही तुरट, आंबट, तर काही किंचीत कडवट चवीच्या या भाज्या गतवर्षी भरपूर प्रमाणावर होत्या आणि त्या भरपूर प्रमाणात खाल्ल्याही; मात्र या वर्षी पावसाचे तुरळक प्रमाण व सुरुवातीचा पाऊस लांबल्याने भाजी उगवणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. 

- आर. बी. पाटील, ए. व्ही. कांबळे, एस. ए. गायकवाड
काही तुरट, आंबट, तर काही किंचीत कडवट चवीच्या या भाज्या गतवर्षी भरपूर प्रमाणावर होत्या आणि त्या भरपूर प्रमाणात खाल्ल्याही; मात्र या वर्षी पावसाचे तुरळक प्रमाण व सुरुवातीचा पाऊस लांबल्याने भाजी उगवणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. - आर. बी. पाटील, ए. व्ही. कांबळे, एस. ए. गायकवाड
टाकळा, माठ, तांदळी, घोळी, आघाडा, कुर्डू, आळंबी, पात्री, भोकर, राजगिरा, उंबर, भारंगी, आंबाडी, ही काही आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या रानभाज्यांची नावे आहेत.
टाकळा, माठ, तांदळी, घोळी, आघाडा, कुर्डू, आळंबी, पात्री, भोकर, राजगिरा, उंबर, भारंगी, आंबाडी, ही काही आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या रानभाज्यांची नावे आहेत.
ऋतू बदलामुळे सर्दी, खोकला, पोटदुखी, डोकेदुखी यांसारखे व संसर्गजन्य आजार होत असतात. या आजारांवर मात करणारे घटक रानभाजीत असल्याने या रोगांवर बिनपैशात उपचार होतो. रानभाजीने आपले आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या खाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.