वाघ (Tiger) हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. घनदाट जंगलं हेच त्याचं आश्रयस्थान. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या गरजा तसेच आधुनिकीकरणाच्या नादात जंगलांच प्रमाण कमी झालं. साहजिकच वाघासारख्या जंगली प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला. त्यामुळे त्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली. हे लक्षात घेता भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पांची (Tiger Reserve) सुरुवात झाली. सुरुवातीला देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
स्टेटस् ऑफ टायगर्स इन इंडियाच्या (States of Tigers in India)अहवालानुसार देशात २००६ साली सुमारे १४११ च्या आसपास असलेली देशातील वाघांची संख्या २०१० साली १७०६ तर आज २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात ती २२२६ इतकी झाली आहे. व्याघ्र संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २००६, २०१०, २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात अनुक्रमे १०३, १६९ आणि १९० वाघांचे अस्तित्व आढळून आल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात एकूण ६ व्याघ्रप्रकल्प आहेत. आपण त्यांची माहिती घेऊया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.