वजन कमी करायचंय! 'या' पाच सवयी असतील तर...

अनेक लोकं वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात
Weight Loss
Weight Loss
Updated on

अनेक लोकं वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. पण तरीही मनासारखं वजन (Weight Loss) काही कमी होत नाही. तर, काही लोकांना वजन कमी करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. वजन कमी करण्यासाठी, संतुलित व्यायाम (Exercise) आणि आहार घेणे गरजेचे आहे. पण, जोपर्यंत आपण आहार आणि जीवनशैलीत (Lifestyle ) बदल करत नाही तोवर चांगले परिणाम मिळत नाहीत. फक्त व्यायाम केला म्हणजे वजन कमी झाले असे होत नाही. तुम्हालाही वजन कमी करणे कठीण जात असेल तर सगळ्यात आधी तुम्ही या प्रवासात येणारे अडथळे शोधले पाहिजेत तुमचे वजन झपाट्याने कमी का होत नाही याची ५ कारणे असू शकतात.

१) तणाव (Stress ) -
तुम्हाला खूप जास्त तणाव असेल तर त्याचा फिटनेसवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तणाव कमी करण्यावर भर द्यावा लागेल. तुम्ही त्यावर सहज नियंत्रण ठेवू शकता. सगळ्यात आधी तुम्ही तणावाचे कारण काय आहे ते ओळखायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत माइंडफुलनेस, ध्यान, योग आणि खोल श्वासोच्छवास असे मन शांत करण्याचे व्यायाम करू शकता. हे व्यायाम तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे उत्पादन (तणावांसाठी जबाबदार) सामान्य पातळीवर कमी करतात.
१) तणाव (Stress ) - तुम्हाला खूप जास्त तणाव असेल तर त्याचा फिटनेसवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तणाव कमी करण्यावर भर द्यावा लागेल. तुम्ही त्यावर सहज नियंत्रण ठेवू शकता. सगळ्यात आधी तुम्ही तणावाचे कारण काय आहे ते ओळखायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत माइंडफुलनेस, ध्यान, योग आणि खोल श्वासोच्छवास असे मन शांत करण्याचे व्यायाम करू शकता. हे व्यायाम तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे उत्पादन (तणावांसाठी जबाबदार) सामान्य पातळीवर कमी करतात.esakal
२) सतत खाणे (Eating Habbit) - तुमचा आहार कितीही चांगला असला तरी जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच ते खाल्ल्याने त्याचा समतोल बिघडतो. यासाठी दिनचर्येत 8-तासांनी खाण्याची वेळ ठरवा. खाणे सुरू करण्यासाठी एक वेळ ठरवा.
२) सतत खाणे (Eating Habbit) - तुमचा आहार कितीही चांगला असला तरी जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच ते खाल्ल्याने त्याचा समतोल बिघडतो. यासाठी दिनचर्येत 8-तासांनी खाण्याची वेळ ठरवा. खाणे सुरू करण्यासाठी एक वेळ ठरवा. esakal
३) वर्कआऊट रूटीनचा अभाव (Workout Problem) -
तुम्हाला सतत गोष्टी बदलाव्या लागतील. तुमची दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करा; तुम्ही दर आठवड्याला तीन दिवसांच्या अंतराने वर्कआऊट करू शकता. त्यात कमी तीव्रतेचे व्यायाम करता येतील. यात Pilates, योगा किंवा चालणे. हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) शरीरातील चयापचय वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
३) वर्कआऊट रूटीनचा अभाव (Workout Problem) - तुम्हाला सतत गोष्टी बदलाव्या लागतील. तुमची दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करा; तुम्ही दर आठवड्याला तीन दिवसांच्या अंतराने वर्कआऊट करू शकता. त्यात कमी तीव्रतेचे व्यायाम करता येतील. यात Pilates, योगा किंवा चालणे. हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) शरीरातील चयापचय वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.esakal
४) जास्त मद्यपान करणे (Drinking Too Much Alcohol) - नियमित मद्यपान केल्याने वजनावर परिणाम होतो. कारण अल्कोहोल शरीराची चरबी जाळण्याची क्षमता मर्यादित करते. जर तुम्ही अल्कोहोल पिणे सोडणार नसाल तर काहीतरी मर्यादा आखली गेली पाहिजे. तुम्ही आठवड्यातून एका ग्लास वाइनपर्यंत पिण्याची सवय मर्यादित करू शकता.
४) जास्त मद्यपान करणे (Drinking Too Much Alcohol) - नियमित मद्यपान केल्याने वजनावर परिणाम होतो. कारण अल्कोहोल शरीराची चरबी जाळण्याची क्षमता मर्यादित करते. जर तुम्ही अल्कोहोल पिणे सोडणार नसाल तर काहीतरी मर्यादा आखली गेली पाहिजे. तुम्ही आठवड्यातून एका ग्लास वाइनपर्यंत पिण्याची सवय मर्यादित करू शकता.
५) पुरेशी झोप न मिळणे (Sleeping Problem) -
पुरेशी झोप न मिळाल्याने तुमचे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना अपयश येऊ शकते. वजन कमी करण्यासाठी योग्य विश्रांती, चांगला आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी होण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही.
५) पुरेशी झोप न मिळणे (Sleeping Problem) - पुरेशी झोप न मिळाल्याने तुमचे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना अपयश येऊ शकते. वजन कमी करण्यासाठी योग्य विश्रांती, चांगला आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी होण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही.esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()