मेंदू कार्यक्षम होण्यासाठी 'हे' नऊ पदार्थ खा!

आळशीपणा सोडून मेंदूला कार्यक्षम करण्यासाठी झटपट उर्जा देणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे
Food For Brain
Food For Brain esakal
Updated on

हिवाळ्यात अनेकांना खूप आळस आणि सुस्ती येते. काही करू नये असे वाटते. किंबहुना सुस्ती आल्यामुळे डोकं काम करेनासं होतं. मेंदूला (Brain) चालना मिळत नाही. यादिवसात सारखे झोपावेसे (Sleep) वाटणे हे आरोग्याच्या दृष्टीने फारसे योग्य नाही. म्हणूनच आळशीपणा सोडून मेंदूला कार्यक्षम करण्यासाठी झटपट उर्जा देणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे. पोषण आहारतज्ज्ञ उमा नायडू यांनी ९ पदार्थ सुचविले आहेत. ते खाल्ल्याने तुमचा मेदू कार्यक्षम होईल. उमा यांच्या मते, ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ (Food) मेंदूच्या कार्यासाठी चांगले आहेत.कारण ते मेंदूसाठी आवश्यक असतात, त्यामुळे अशा पदार्थांचा समावेश तुम्हाला आहारात करता येईल.

अंडी (Eggs)- अंड्यामध्ये असलेल्या नैसर्गित मल्टीव्हिटॅमिनममुळे मेंदूचे कार्य, समन्वय आणि स्मरणशक्ती सुधारतेच. शिवाय त्याचे कार्य चांगले चालण्यासाठी मदत मिळते.
अंडी (Eggs)- अंड्यामध्ये असलेल्या नैसर्गित मल्टीव्हिटॅमिनममुळे मेंदूचे कार्य, समन्वय आणि स्मरणशक्ती सुधारतेच. शिवाय त्याचे कार्य चांगले चालण्यासाठी मदत मिळते. esakal
सीफूड (Seafood) : सीफूडमध्ये ओमेगा 3 चे प्रमाण जास्त असते. तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आवश्यक फॅट्स यामध्ये असतात.
सीफूड (Seafood) : सीफूडमध्ये ओमेगा 3 चे प्रमाण जास्त असते. तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आवश्यक फॅट्स यामध्ये असतात.
हिरव्या भाज्या(Green Veggies)  उमा यांच्या मते, मेंदूचे कार्य चांगले चालण्याबरोबर संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी हिरव्या भाज्यांमुळे मदत मिळते.
हिरव्या भाज्या(Green Veggies) उमा यांच्या मते, मेंदूचे कार्य चांगले चालण्याबरोबर संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी हिरव्या भाज्यांमुळे मदत मिळते. esakal
बीट (Beets)  - बीटात नायट्रिक ऑक्साईड असतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. तसेच मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते.
बीट (Beets) - बीटात नायट्रिक ऑक्साईड असतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. तसेच मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते. esakal
एव्होकाडो(Avocados)-  एव्होकाडोमध्ये ल्युटीन मुबलक प्रमाणात असते. मेंदूच्या कार्यावर ल्युटीनचा खूप चांगला प्रभाव पडतो.
एव्होकाडो(Avocados)- एव्होकाडोमध्ये ल्युटीन मुबलक प्रमाणात असते. मेंदूच्या कार्यावर ल्युटीनचा खूप चांगला प्रभाव पडतो.esakal
बेरीज (Berries)- बेरीज खाल्ल्याने मानसिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूमधील रक्तपुरवठा वाढतो.
बेरीज (Berries)- बेरीज खाल्ल्याने मानसिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूमधील रक्तपुरवठा वाढतो. esakal
डार्क चॉकलेट (Dark Chocolate) - डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्यातला मानसिक थकवा दूर होतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारू शकते. तसेच स्मरणशक्ती वाढू शकते.
डार्क चॉकलेट (Dark Chocolate) - डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्यातला मानसिक थकवा दूर होतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारू शकते. तसेच स्मरणशक्ती वाढू शकते. esakal
 नट्स(Mixed Nuts)- नट्स मध्ये फॅट, प्रथिने आणि फायबर अतिशय चांगल्या प्रमाणात असते. यामुळे मेंदू - शरीराला चांगल्या प्रमाणात इंधन वा उर्जा मिळते
नट्स(Mixed Nuts)- नट्स मध्ये फॅट, प्रथिने आणि फायबर अतिशय चांगल्या प्रमाणात असते. यामुळे मेंदू - शरीराला चांगल्या प्रमाणात इंधन वा उर्जा मिळते esakal
लिंबूवर्गीय फळे (Citrus Fruits) - लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे  ही फळे खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते.
लिंबूवर्गीय फळे (Citrus Fruits) - लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही फळे खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते.ESAKAL

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.