वेलडन बॉइज! पाहा रोमांचक सामन्यातील विजयी क्षणचित्रे

वेलडन बॉइज! पाहा रोमांचक सामन्यातील विजयी क्षणचित्रे
Updated on

Tokyo Olympics 2020 IND vs GER Hockey Bronze Medal Game : सामन्यातील 25 व्या मिनिटाला 3-1 पिछाडीवर असताना जबरदस्त कमबॅक करत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करुन दाखवले. या विजयासह भारतीय संघाने ब्राँझ पदकावर नाव कोरले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 3 गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 2 गोल डागून जर्मनीला बॅकफूटवर ढकलले. 1980 मध्ये 1 गोलच्या फरकाने भारतीय संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर तब्बल 41 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केलीये.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये 25, 27 आणि 29 व्या मिनिटाला भारताने गोल डागत पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने सामना बरोबरीत आणून जर्मनीच्या आघाडीला सुरुंग लावला.तिसऱ्या क्वार्टरमध्ये रुपिंदर पालने भारतीय संघाला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. पेनल्टी स्ट्रोक गोलमध्ये रुपांतरीत करत भारतीय संघाने आघाडी मिळवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.