कोरियन चहा प्या... प्रतिकारशक्ती वाढवा!

सहा प्रकारच्या चहांमुळे तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्याबरोबर इतरही फायदे होतील
Korean Tea
Korean Tea google
Updated on

जर तुम्हाला रोजरोज तोच चहा पिऊन थोडासा कंटाळा आला असेल तर तुम्ही थोडा बदल करू शकता. सध्या लोकांना कोरियन (Korean) फिवर चढलाय. कोरियन ड्रामा, के-पॉप डाएट, कोरियन लाईफस्टाईल (Lifestyle) अवलंबण्याकडे अनेकांचा कल आहे. किमची आणि रामेन हे पदार्थ तर आता लोकप्रिय होत आहेत. पण जर तुम्हाला काही वेगळा चहा (Tea) प्यायची खरोखरच इच्छा असेल तर तुम्ही कोरियन चहा नक्की पिऊ शकता. हा चहा प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढेलच शिवाय वजन कमी होईल. सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल. त्यामुळे या प्रकारचे चहा प्यायचा विचार करा.

ओमिजा टी (Omija tea)- हा चहा ओमजा बॅरीपासून तयार केला जातो. तसेच तो मध घालून प्यायला दिला जातो. तसेच मूगसुद्धा चवीसाठी यात घातले जातात. ओमिजा म्हणजे पाच फ्लेवर्स. या चहाच्या प्रकारात औषधी गुणधर्म असल्याने सर्दी खोकला झालेल्यांसाठी तो उपयुक्त ठरतो. तसेच यकृतासाठीही हा चहा चांगला आहे.
ओमिजा टी (Omija tea)- हा चहा ओमजा बॅरीपासून तयार केला जातो. तसेच तो मध घालून प्यायला दिला जातो. तसेच मूगसुद्धा चवीसाठी यात घातले जातात. ओमिजा म्हणजे पाच फ्लेवर्स. या चहाच्या प्रकारात औषधी गुणधर्म असल्याने सर्दी खोकला झालेल्यांसाठी तो उपयुक्त ठरतो. तसेच यकृतासाठीही हा चहा चांगला आहे. google
क्रायसॅन्थेमम टी (Chrysanthemum tea) - हा आणखी एक लोकप्रिय चहा आहे. फुले सुकवून ती मधात काही महिन्यासांठी भिजवून ठेवली जातात. त्यानंतर ती गरम पाण्यात उकळवली जातात. तयार झालेला हा किंचित गोड चहा थंडीत जास्त प्रमाणात वापरला जातो.
क्रायसॅन्थेमम टी (Chrysanthemum tea) - हा आणखी एक लोकप्रिय चहा आहे. फुले सुकवून ती मधात काही महिन्यासांठी भिजवून ठेवली जातात. त्यानंतर ती गरम पाण्यात उकळवली जातात. तयार झालेला हा किंचित गोड चहा थंडीत जास्त प्रमाणात वापरला जातो. google
सिट्रोन टी (​Citron tea) - हा चहा युझू फळाच्या प्रिझर्व्ह केलेल्या स्लाईसमधून बनविला जातो. त्याचे पातळ काप मधात घोळवून ठेवले जातात. मध स्लाइस टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच चहाला गोड चव आणण्यास मदत करते. सर्दी-खोकल्यासाठी हा चहा उपयुक्त आहे.

कॉर्न टी (Corn tea) -  वजन कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे. हा चहा वाळवलेल्या कॉर्न कर्नल्स (dried corn kernels) आणि कॉर्न सिल्क (corn silk) पासून तयार केला जातो. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा पिणे अत्यंत उपयुक्त आहे.

युल्मू-चा-टी (Yulmu-cha tea) हा चहा जॉब्स टिअर टी म्हणून ओळखला जातो. हा चहा अक्रोड, बदाम, काळे सोयाबीन, काळे तीळ, कॉर्न, ब्राऊन राईस आणि भरपूर साखर याच्या मिश्रणातून केला जातोय कोरियामध्ये उच्च प्रथिनं असलेला चहा म्हणून हा मानला जातो.

ग्रीन प्लम टी (Green Plum tea)- उन्हाळ्याच्या दिवसात कोरियात या चहाचा आनंद घेतला जातो. यामुळे आतडे निरोगी राहते. गोड मेसिल सिरपमध्ये मनुका घालून आंबवतात. हे पेय ताजेतवाने बनवण्यासाठी पाणी घालतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात गरम पाणीही घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.