सर्वात यशस्वी ODI कॅप्टन कोण, सौरभ की विराट?

Virat Kohli And Sourav Ganguly
Virat Kohli And Sourav Gangulysakal
Updated on

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गजांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यशस्वी कामगिरी करुन दाखवली. काहींनी सर्वाधिक काळ पद भूषवले तर काहींनी अल्पावधीत ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली. संघाचे नेतृत्व करत असताना प्रत्येकाला चढ उताराचा सामना करावा लागला. त्यांच्या यश-अपयशातही एक अविस्मरणीय कहाणी दडली आहे. जाणून घेऊयात याचाच एक आढावा....

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न जर विचारला तर पहिलं नाव येतं ते म्हणजे महेंद्रसिंह धोनी.  2007 मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिली T-20 विश्व कप जिंकला. तोपर्यंत भारतीय संघाला कोणीही या स्पर्धेसाठी दावेदार मानत नव्हते.  धोनीची विजय गाथा इथच थांबली नाही.. तर 2011 च्या विश्वचषकातही त्याने विशेष छाप सोडली. क्रिकेटच्या देवाचे स्वप्रपूर्ती ही धोनीच्या नेतृत्वातच झाली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला.  त्यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.  धोनीने 11 वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केले.  तो भारतीय संघाचाच नव्हे तर क्रिकेट जगतातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कारण त्याने  तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार आहे.  धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने 200 एकदिवसीय सामने खेळले आणि 110 जिंकले, 74 गमावले, 5 बरोबरी आणि 11 मध्ये निकाल लागला नाही.  त्याची विजयी सरासरी 59.52 आहे.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न जर विचारला तर पहिलं नाव येतं ते म्हणजे महेंद्रसिंह धोनी. 2007 मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिली T-20 विश्व कप जिंकला. तोपर्यंत भारतीय संघाला कोणीही या स्पर्धेसाठी दावेदार मानत नव्हते. धोनीची विजय गाथा इथच थांबली नाही.. तर 2011 च्या विश्वचषकातही त्याने विशेष छाप सोडली. क्रिकेटच्या देवाचे स्वप्रपूर्ती ही धोनीच्या नेतृत्वातच झाली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीने 11 वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केले. तो भारतीय संघाचाच नव्हे तर क्रिकेट जगतातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कारण त्याने तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने 200 एकदिवसीय सामने खेळले आणि 110 जिंकले, 74 गमावले, 5 बरोबरी आणि 11 मध्ये निकाल लागला नाही. त्याची विजयी सरासरी 59.52 आहे.sakal
2000 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यात आले जेव्हा मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली.  2012 मध्ये अझहरने कोर्टात याविरुद्धचा खटला जिंकला आणि त्यानंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाला.  अझहरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.  1990 ते 1990 पर्यंत अझहरने भारतीय संघाची धुरा सांभाळली.  त्याने 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.  भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1985 मध्ये पदार्पण करणाऱ्या अझरला पाच वर्षांनंतर कर्णधारपद सोपवण्यात आले.  त्याच्या नेतृत्वाखाली  टीम इंडियाने 90 सामने जिंकले आणि 76 गमावले.  त्याची विजयी सरासरी 54.16 होती.
2000 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यात आले जेव्हा मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. 2012 मध्ये अझहरने कोर्टात याविरुद्धचा खटला जिंकला आणि त्यानंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाला. अझहरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. 1990 ते 1990 पर्यंत अझहरने भारतीय संघाची धुरा सांभाळली. त्याने 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1985 मध्ये पदार्पण करणाऱ्या अझरला पाच वर्षांनंतर कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 90 सामने जिंकले आणि 76 गमावले. त्याची विजयी सरासरी 54.16 होती.sakal
सध्याच्या घडीला भारतीय संघाचा क्रिकेट जगतात दबदबा दिसून येतो. गांगुलीने मजबूत भारतीय संघाचा पाया रचला. भारतीय संघाची बांधणी करणारा कर्णधार म्हणून त्याला ओळखले जाते.   भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या वाईट टप्प्यातून जात असताना त्यांने संघाची धुरा सांभाळली.  गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम केले.  त्याने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले.  त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.  मात्र, दुर्दैवाने तेथे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.  गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 76 सामने जिंकले, 65 गमावले आणि पाच सामन्यांचा निकाल लागला नाही.  त्याची विजयी सरासरी 53.90 होती.
सध्याच्या घडीला भारतीय संघाचा क्रिकेट जगतात दबदबा दिसून येतो. गांगुलीने मजबूत भारतीय संघाचा पाया रचला. भारतीय संघाची बांधणी करणारा कर्णधार म्हणून त्याला ओळखले जाते. भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या वाईट टप्प्यातून जात असताना त्यांने संघाची धुरा सांभाळली. गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम केले. त्याने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, दुर्दैवाने तेथे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 76 सामने जिंकले, 65 गमावले आणि पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याची विजयी सरासरी 53.90 होती.sakal
 विराट कोहलीने 2017 मध्ये भारतीय संघाचे एकदिवसीय कर्णधारपद स्वीकारले तेव्हापासून भारतीय संघाचे 95 सामन्यात त्याने नेतृत्व केले त्यापैकी 65 सामन्यांमध्ये विजयी तर 27  सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या विजयाची सरासरी 70.46 होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकूण 19 एकदिवसीय मालिकेत भाग घेतला.  यामध्ये संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि 15 मालिका आपल्या नावावर केल्या.  कोहलीचे कर्णधारपदाचे नाणे केवळ 4 मालिकांमध्ये चालले नाही.  या अर्थाने तो टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची त्याला तीनवेळा संधी मिळाली पण त्याला संधीच सोनं करता आले नाही.
विराट कोहलीने 2017 मध्ये भारतीय संघाचे एकदिवसीय कर्णधारपद स्वीकारले तेव्हापासून भारतीय संघाचे 95 सामन्यात त्याने नेतृत्व केले त्यापैकी 65 सामन्यांमध्ये विजयी तर 27 सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या विजयाची सरासरी 70.46 होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकूण 19 एकदिवसीय मालिकेत भाग घेतला. यामध्ये संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि 15 मालिका आपल्या नावावर केल्या. कोहलीचे कर्णधारपदाचे नाणे केवळ 4 मालिकांमध्ये चालले नाही. या अर्थाने तो टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची त्याला तीनवेळा संधी मिळाली पण त्याला संधीच सोनं करता आले नाही. sakal
राहुल द्रविड

'द वॉल' या नावाने प्रसिद्ध असलेला कर्णधार राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या काळात द्रविडने फलंदाजी म्हणून अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या.  द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने 79 एकदिवसीय सामने खेळले आणि 42 जिंकले.  त्याची विजयी सरासरी 56 होती, जी चांगलीच म्हणता येईल.  त्याच्या नेतृत्वाखाली भारताने धावांचा पाठलाग करताना सलग 16 सामने जिंकण्याचा विक्रमही केला.
राहुल द्रविड 'द वॉल' या नावाने प्रसिद्ध असलेला कर्णधार राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या काळात द्रविडने फलंदाजी म्हणून अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने 79 एकदिवसीय सामने खेळले आणि 42 जिंकले. त्याची विजयी सरासरी 56 होती, जी चांगलीच म्हणता येईल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने धावांचा पाठलाग करताना सलग 16 सामने जिंकण्याचा विक्रमही केला.sakal
ज्यावेळी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचा दबदबा होता. 1983 मध्ये भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असे स्वप्न भारतीयांनी सोडा पण खुद्द संघातील खेळाडूंनीही पाहिले नव्हते. पण कपिल पांजींनी इतिहास घडवून दाखवला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला. भारतीय क्रिकेटची खरी झलक यावेळीच दिसली. या विजयाने क्रिकेट जगताचा भारतीय संघाकडे बघण्यााचा दृष्टिकोनच बदलून टाकला.  कपिल देव यांनी  74 ODI सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले.  यात 39 सामने जिंकले तर 33 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यांचे विजयाची सरासरी 54.16 होती.
ज्यावेळी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचा दबदबा होता. 1983 मध्ये भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असे स्वप्न भारतीयांनी सोडा पण खुद्द संघातील खेळाडूंनीही पाहिले नव्हते. पण कपिल पांजींनी इतिहास घडवून दाखवला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला. भारतीय क्रिकेटची खरी झलक यावेळीच दिसली. या विजयाने क्रिकेट जगताचा भारतीय संघाकडे बघण्यााचा दृष्टिकोनच बदलून टाकला. कपिल देव यांनी 74 ODI सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यात 39 सामने जिंकले तर 33 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यांचे विजयाची सरासरी 54.16 होती. sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.