हृदयविकाराचा झटका अचानक का येतो आणि आल्यानंतर काय काळजी घ्यावी ...

योग्य प्रथमोपचाराच्या मदतीने हृदयविकाराचा धोका कमी करता येऊ शकतो
heart attack
heart attacksakal
Updated on

बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांचं कोलकाता येथे निधन झालं. कोलकात्यातील गुरुदास कॉलेजमध्ये आयोजित झालेल्या कार्यक्रमात ते गाणे म्हणत असतानाच त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली. त्यांना तिथेच अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटल गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे की, केकेंचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.

या पार्श्वभूमीवर हृदयविकाराचा झटका अचानक का येतो, त्याची प्रमुख लक्षणे काय असतात, हृदयविकाराचा झटका आल्यावर काय काळजी घ्यावी ही सविस्तर माहिती पाहणार आहोत.
या पार्श्वभूमीवर हृदयविकाराचा झटका अचानक का येतो, त्याची प्रमुख लक्षणे काय असतात, हृदयविकाराचा झटका आल्यावर काय काळजी घ्यावी ही सविस्तर माहिती पाहणार आहोत.
हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख लक्षणे कोणती
१)अचानकपणे छातीत  दुखल्यासारखे वाटणे
२)मन अस्वस्थ होणे
३)शरिरातुन प्रचंड घाम येणे
४) श्वास घेण्यास त्रास होणे ,श्वास घेताना धाप लागणे
५)मळमळ होऊन ऊलटीसारखं वाटणे.
६)ठसका लागून खोकल्यांची उबळ येणे.
७)छातीच्या बरगड्या, हात,मान,पाठ ,जबडा पोटाकडे जाणाऱ्या मार्गात अडथळा आल्यासारखे भासणे.
हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख लक्षणे कोणती १)अचानकपणे छातीत दुखल्यासारखे वाटणे २)मन अस्वस्थ होणे ३)शरिरातुन प्रचंड घाम येणे ४) श्वास घेण्यास त्रास होणे ,श्वास घेताना धाप लागणे ५)मळमळ होऊन ऊलटीसारखं वाटणे. ६)ठसका लागून खोकल्यांची उबळ येणे. ७)छातीच्या बरगड्या, हात,मान,पाठ ,जबडा पोटाकडे जाणाऱ्या मार्गात अडथळा आल्यासारखे भासणे.
हृदयविकाराचा झटका अचानक का येतो
हृदयविकाराचा झटका येण्यामागे तज्ञ ही कारणे सामान्यपणे सांगतात.
१)फास्ट फूडचे अतिसेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते.
२) तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असले तर तेव्हाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
३) तुमच्या शरीरातील रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असले किंवा तुम्हाला मधुमेहाचा त्रास असले तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हृदयविकाराचा झटका अचानक का येतो हृदयविकाराचा झटका येण्यामागे तज्ञ ही कारणे सामान्यपणे सांगतात. १)फास्ट फूडचे अतिसेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते. २) तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असले तर तेव्हाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. ३) तुमच्या शरीरातील रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असले किंवा तुम्हाला मधुमेहाचा त्रास असले तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हृदयविकाराचा झटका आल्यास या गोष्टी लक्षात ठेवा
१) जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या छातीत अचानक दुखू लागले तेव्हा क्षणांचाही विलंब न करता तातडीने त्या व्यक्तीस दवाखान्यात घेऊन जावे.
२)अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घ्याव्यात. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवुन चखळावी.
हृदयविकाराचा झटका आल्यास या गोष्टी लक्षात ठेवा १) जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या छातीत अचानक दुखू लागले तेव्हा क्षणांचाही विलंब न करता तातडीने त्या व्यक्तीस दवाखान्यात घेऊन जावे. २)अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घ्याव्यात. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवुन चखळावी.
३) ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याय त्या व्यक्तीने अनावश्यक हालचाल करू नये. स्वतः पायी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करू नये. जिने चढणं आणि उतरणं करू नये. स्वतः गाडी चालवू नये
४) छातीत दुखतं म्हणजे जळकी लागली असले ,असे तर्क न बांधता लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेऊनच प्रथमोपचार सुरु करावा.
५) दवाखान्यात गेल्यावर सर्वप्रथम ECG काढावा.
३) ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याय त्या व्यक्तीने अनावश्यक हालचाल करू नये. स्वतः पायी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करू नये. जिने चढणं आणि उतरणं करू नये. स्वतः गाडी चालवू नये ४) छातीत दुखतं म्हणजे जळकी लागली असले ,असे तर्क न बांधता लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेऊनच प्रथमोपचार सुरु करावा. ५) दवाखान्यात गेल्यावर सर्वप्रथम ECG काढावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()