World Photography Day 2021 - जगणं समतोल करूया...

World Photography Day
World Photography Dayesaakl
Updated on
Summary

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ‘जगणं समतोल’ विषयावरील छायाचित्रे पाठविण्याविषयी ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनास हौशी छायाचित्रकारांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यातील निवडक छायाचित्रांना आजच्या अंकात स्थान देण्यात आले आहे. छायाचित्रांमधून जगण्याविषयीची सकारात्मकता मांडण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला आहे, हे विशेष उल्लेखनीय.

(संकलन-लेखन : संभाजी गंडमाळे, बी. डी. चेचर, अमोल सावंत)

आरोग्यदायी संस्कार.. 

योग-ध्यान ही तर भारताने जगाला दिलेली देणगी. या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेतच. त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीवरही हा संस्कार झाला पाहिजे, असा संदेश देणारे वैभव पाटील यांचे छायाचित्र.
आरोग्यदायी संस्कार.. योग-ध्यान ही तर भारताने जगाला दिलेली देणगी. या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेतच. त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीवरही हा संस्कार झाला पाहिजे, असा संदेश देणारे वैभव पाटील यांचे छायाचित्र.VAIBHAV PATIL PHOTOGRAPHY
निरोगी जगण्याचं सौंदर्याच..

हाडाची काडं करुन राब राब राबलं, की रात्री आपसूकच कसलीही गोळी न घेता शांत झोप लागते आणि हे राबणंच एकदा जगणं झाल, की चेहऱ्यावर खुणाही एक लखलखीत सौंदर्य ठरतं, असा संदेश देणारं रहित कांंबळे यांचं छायाचित्र..
निरोगी जगण्याचं सौंदर्याच.. हाडाची काडं करुन राब राब राबलं, की रात्री आपसूकच कसलीही गोळी न घेता शांत झोप लागते आणि हे राबणंच एकदा जगणं झाल, की चेहऱ्यावर खुणाही एक लखलखीत सौंदर्य ठरतं, असा संदेश देणारं रहित कांंबळे यांचं छायाचित्र..
सकस आहारासाठी... 

शारीरिक कष्टाबरोबरच सकस आहारही तितकाच महत्त्वाचा. त्यातही स्थानिक फळे आणि भाज्यांचा आहारातील समावेश अधिक आरोग्यदायी ठरतो, असा संदेश देणारे आदित्य ऐनापुरे यांचे हे विचार करावयास लावणारे छायाचित्र.
सकस आहारासाठी... शारीरिक कष्टाबरोबरच सकस आहारही तितकाच महत्त्वाचा. त्यातही स्थानिक फळे आणि भाज्यांचा आहारातील समावेश अधिक आरोग्यदायी ठरतो, असा संदेश देणारे आदित्य ऐनापुरे यांचे हे विचार करावयास लावणारे छायाचित्र.
जगणं सकारात्मक 
आयुष्यात अनेक अडचणी, संकटं येतातच. पण, त्यातून खचून न जाता पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा सकारात्मक विचारच जगण्याला आत्मविश्वास देत राहतो, असा संदेश देणारे विजय कोळेकर ,पेठवडगांव यांचे छायाचित्र.
जगणं सकारात्मक आयुष्यात अनेक अडचणी, संकटं येतातच. पण, त्यातून खचून न जाता पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा सकारात्मक विचारच जगण्याला आत्मविश्वास देत राहतो, असा संदेश देणारे विजय कोळेकर ,पेठवडगांव यांचे छायाचित्र.
ओवी जात्यावरची... 

दगडाचे पाटा-वरवंटा, जाती हीच खरी भारतीय संस्कृती. जात्यावरच्या ओव्या म्हणत दळप दळणं हा एक शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर उपयोगी ठरणारा संस्कार. अजूनही काही ठिकाणी त्याच्या अशा पाऊलखुणा दिसतात आणि म्हणूनच ते विकणारी माणसंही भेटतात. मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील युवराज देसाई यांनी घेतेलेले छायाचित्र.
ओवी जात्यावरची... दगडाचे पाटा-वरवंटा, जाती हीच खरी भारतीय संस्कृती. जात्यावरच्या ओव्या म्हणत दळप दळणं हा एक शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर उपयोगी ठरणारा संस्कार. अजूनही काही ठिकाणी त्याच्या अशा पाऊलखुणा दिसतात आणि म्हणूनच ते विकणारी माणसंही भेटतात. मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील युवराज देसाई यांनी घेतेलेले छायाचित्र.
सहवास रानावनाचा... 

सिमेंट कॉंक्रिटच्या जंगलातली स्पर्धा रोजचीच आहे. पण, शारिरीक श्रमाबरोबरच रानावनाचा सहवास जगण्यासाठी निश्चितच नवी प्रेरणा देत राहतो, असा संदेश देणारे अवधूत कुंभार , माजगांव पन्हाळा यांचे हे छायाचित्र.
सहवास रानावनाचा... सिमेंट कॉंक्रिटच्या जंगलातली स्पर्धा रोजचीच आहे. पण, शारिरीक श्रमाबरोबरच रानावनाचा सहवास जगण्यासाठी निश्चितच नवी प्रेरणा देत राहतो, असा संदेश देणारे अवधूत कुंभार , माजगांव पन्हाळा यांचे हे छायाचित्र.
नियम जगण्याचा... 

नेहमी डावीकडून चालावे, हा नियम जसा आपल्याला पाळावा लागतो. तसाच समतोल जगण्यासाठीची गती समतोल ठेवायची असेल तर रोज किमान काही मिनिटे चालण्याचा व्यायाम आवश्यकच असतो, असा संदेश देणारे अनिस मोहिते यांचे छायाचित्र.
नियम जगण्याचा... नेहमी डावीकडून चालावे, हा नियम जसा आपल्याला पाळावा लागतो. तसाच समतोल जगण्यासाठीची गती समतोल ठेवायची असेल तर रोज किमान काही मिनिटे चालण्याचा व्यायाम आवश्यकच असतो, असा संदेश देणारे अनिस मोहिते यांचे छायाचित्र.
सर्वेपि सुखिन: संतु..

आयुष्याच्या रंगमंचावर सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी रोज किमान काही वेळाचं ध्यान टवटवीत ऊर्जा देते, असा संदेश देणारे शुभम अंजणेकर (कोल्हापूर) यांचे छायाचित्र..
सर्वेपि सुखिन: संतु.. आयुष्याच्या रंगमंचावर सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी रोज किमान काही वेळाचं ध्यान टवटवीत ऊर्जा देते, असा संदेश देणारे शुभम अंजणेकर (कोल्हापूर) यांचे छायाचित्र..
भाळी टिकलीचा टिळा...  

भाळी कुंकवाचा टिळा ही भारतीय संस्कृती. काळाच्या ओघात कुंकूची जागा टिकलीनं घेतली. पण, कुंकवाच्या टिळ्यामागेही एक आरोग्यदायी विचार आहे आणि त्याची महती अनेक भारूडांतून व्यक्त झाली आहे. संदीप मगदूम यांनी घेतलेले छायाचित्र.
भाळी टिकलीचा टिळा... भाळी कुंकवाचा टिळा ही भारतीय संस्कृती. काळाच्या ओघात कुंकूची जागा टिकलीनं घेतली. पण, कुंकवाच्या टिळ्यामागेही एक आरोग्यदायी विचार आहे आणि त्याची महती अनेक भारूडांतून व्यक्त झाली आहे. संदीप मगदूम यांनी घेतलेले छायाचित्र.
पारंपरिक खेळ कोल्हापूर - 

व्हिडिओ गेमच्या जमानात्यातही पारंपरिक खेळांचा असा आनंद शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर नक्कीच आरोग्यदायी ठरतो. एका विशिष्ट गतीत साधी टायर फिरवतानाही चेहऱ्यावर असे समाधान असते. अतुल भालबर,पट्टणकोडोली ता.हातकणगले यांनी टिपलेले छायाचित्र.
पारंपरिक खेळ कोल्हापूर - व्हिडिओ गेमच्या जमानात्यातही पारंपरिक खेळांचा असा आनंद शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर नक्कीच आरोग्यदायी ठरतो. एका विशिष्ट गतीत साधी टायर फिरवतानाही चेहऱ्यावर असे समाधान असते. अतुल भालबर,पट्टणकोडोली ता.हातकणगले यांनी टिपलेले छायाचित्र.
सुख-दुखःचे साथी... 

‘सुख के सब साथी, दुखमे ना कोई..‘ असं म्हणतात. पण, आजही गावगाड्यातल्या शेत-शिवारात राबणारी ही माणसं एकमेकांच्या सुख-दुखःत तितक्याच आत्मियतेने सहभागी होतात आणि एकूणच जगणं समतोल करतात. स्मिता कुंभार ,माजगांव यांनी घेतलेले छायाचित्र.
सुख-दुखःचे साथी... ‘सुख के सब साथी, दुखमे ना कोई..‘ असं म्हणतात. पण, आजही गावगाड्यातल्या शेत-शिवारात राबणारी ही माणसं एकमेकांच्या सुख-दुखःत तितक्याच आत्मियतेने सहभागी होतात आणि एकूणच जगणं समतोल करतात. स्मिता कुंभार ,माजगांव यांनी घेतलेले छायाचित्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()