ITI Student: आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! शिक्षक गैरहजर राहिल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा

आयटीआयचे विद्यार्थी घड्याळी तासिकेच्या भरवशावर
ITI Student
ITI Studentesakal
Updated on

मालेगाव: औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालेगाव येथील पूर्ण वेळ निदेशकांची /शिक्षकांची पदे रिक्त असल्याने येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य घड्याळी तासिकांवर काम करणाऱ्या शिक्षक विदेशकांच्या हाती आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी हजर असतात परंतु शिक्षक/ निदेशक गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे.

विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यांनी स्वयंरोजगार करावा त्यांच्या अंगी कौशल्याचा विकास व्हावा म्हणून राज्य सरकार व केंद्र शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केल्या आहेत.

तालुका स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था निर्माण केल्या आहेत. त्याच्या इमारत बांधकामासाठी त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री कच्चामाल देखभाल दुरुस्ती यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते.

ITI Student
विद्यार्थ्यांची ‘पॉलिटेक्निक’ला सर्वाधिक पसंती! प्रवेश क्षमता एक लाख अन्‌ नोंदणी १.४० लाख विद्यार्थ्यांची

सर्व संसाधने उपलब्ध आहेत परंतु शिकवणारे निदेशक शिक्षक नसले तर त्याचा काय उपयोग होणार अशी काहीशी परिस्थिती मालेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झाली आहे.

या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिकल वायरमन वेल्डर फिटर इलेक्ट्रॉनिक्स देश मेकिंग हे ट्रेड आहेत. इलेक्ट्रिकलसाठी शिक्षकांची गटनिर्देशक निदेशकांची दोन पदे आहेत. या दोन्ही पदांवर घडाळी तासिकांवर कर्मचारी नेमले आहेत.

वायरमन ट्रेड साठी एक कायमस्वरूपी तर एक घडाळी तासिकांवर कर्मचारी कार्यरत आहे. वेल्डर रीड साठी तासिकांवर कर्मचारी नेमलेले आहेत. फिटर ट्रेड साठी दोन कर्मचारी कायमस्वरूपी तर एक कर्मचारी घड्याळी तासिकांवर नेमलेला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड साठी व ड्रेस मेकिंगसाठी कायमस्वरूपी शिक्षक निदेशक कार्यरत आहेत. घड्याळी तासिका वरील कर्मचारी गैरहजर असल्याने मुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था येतात परंतु त्यांना शिकवण्यासाठी कोणीच नसते त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षणाचा दर्जा चांगला राहावा विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण मिळावे त्यासाठी कुठेही निधीची कमतरता पडू नये म्हणून राज्य शासनाने २०१०-११ मध्ये अडीच कोटी रक्कम फिक्स डिपॉझिट या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे करता केलेली आहे.

त्यापासून मिळणारे व्याजावर जरी इमारतीची देखभाल दुरुस्ती केली असती विद्यार्थ्यांना सुविधा पुरविल्या असत्या तर शासनाचा पैसा उपयोगात योग्य प्रकारे आणल्याचे समाधान मिळू शकले असते.

ITI Student
Accident: मलकापूर नजिक विचित्र अपघात! चार जणांचा दुर्दैवी मृत्यू; गर्भवती महिलेचा देखील समावेश

आयटीआय परिसरात वाढली झुडपे

या इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. इमारती लगतचे पाणी वाहून जाण्यासाठी काढण्यात आलेल्या ड्रेन पूर्ण भरलेले आहे. त्यामध्ये दगड माती पडलेली असून झुडपे वाढलेली आहेत. परिसराची स्वच्छता ठेवण्यात येत नसल्याचे दिसते

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आवश्यक तेवढे शिक्षक /निदेशक कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य तांत्रिक ज्ञान मिळत नाही ते मिळावे म्हणून येथील घड्याळीचा तासिकांवरील कर्मचारी उपस्थित राहतील याकडे लक्ष द्यावे किंवा लवकरात लवकर कायमस्वरूपी कर्मचारयांची नियुक्ती करावी अशी मागणी

-जावेद भवानी वाले सामाजिक कार्यकर्ते

शासनाने अनामत ठेवलेल्या रकमेमधून खर्च करीत असताना संबंधित कामाचे एकत्रित अंदाजपत्रक तयार करून निविदा मागवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली काम पूर्ण करून घ्यावे म्हणजे शासनाचा पैसा योग्य प्रकारे खर्च होईल. सध्या तसे होत नाही याकडे जिल्हाधिकारी व खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

-विठ्ठल भागवत, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.