Jalgaon Cyber Police : सायबर गुन्हेगारांचे विविध राज्यांतील सिंडिकेट ब्रेक; काश्मीरसह मुंबईतून 1 अटकेत

 1 arrested from Mumbai including Kashmir in cyber crime jalgaon news
1 arrested from Mumbai including Kashmir in cyber crime jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon Cyber Police : विविध राज्यांतील सायबर गुन्हेगारांनी ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी देशपातळीवर आपले जाळे (सिंडिकेट) विणले आहे.

विविध राज्यांतील सायबर गुन्हेगार ऑनलाइन एकत्रित येऊन नागरिकांना गुंतवणुकीचे आमिष देत लाखो रुपये लुबाडत असल्याचे जळगाव सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

गुन्हेगारांचे हे सिंडिकेट ब्रेक करून जम्मू-काश्मीरमधून एक, मुंबईतून दुसऱ्या संशयितास अटक करण्यास पथकाला यश आले आहे. (1 arrested from Mumbai including Kashmir in cyber crime jalgaon news)

सुरवातीला मोबाईलवरून दिवसाला पाचशे-हजार रुपये कमवा, असे आमिष देत मोठ्या प्रमाणावर विविध राज्यांतून ग्राहक गोळा केले जातात. प्रत्येकाला यूट्युब व्हिडिओ सबस्क्राइब करायला भाग पाडले जाते. तिसऱ्या टप्प्यात अमेझॉन, मंत्रा, मेशो, फ्लिपकार्ट अशा मल्टिनॅशनल कंपन्यांच्या प्लॅटफार्मवरील प्रॉडक्ट लाइक करण्यास सांगत त्यांच्या बँक खात्यात सुरवातीलाच हजार, दोन हजार रुपये पाठवून त्यांचे आमिष वाढविण्यात येते.

घरबसल्या पैसा मिळतो. गुंतवणुकीसाठी घरदार विक्री करून लोक पैसा उभा करतात. अशा ग्राहकांना मग क्रिप्टो करन्सी, बुलीयन्स याच्या गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जाते. त्यासाठी शेअर बाजाराप्रमाणे गुंतवणुकीचे आलेख असलेल्या बनावट वेबसाइटवर लॉग-ईन पासवर्ड दिले जातात. एकदा की ग्राहक गुंतल्याची खात्री झाली, की मग त्याच्याकडून लाखो रुपये गुंतवणुकीच्या नावे गंडवले जातात.

या वेबसाइटसह संबंधितांचे संपर्कही बंद होतात. अशाच खेळात जळगाव जिल्ह्या‍तील कित्येक व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर आणि उच्चशिक्षितांची फसवणूक करण्यात आली होती. सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचे अवलोकन करता जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सायबर पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 1 arrested from Mumbai including Kashmir in cyber crime jalgaon news
Cyber Crime : ई-मेल आयडीमध्ये केवळ एक गोष्ट बदलून WHO अधिकाऱ्याला गंडा; लाखो रुपयांची फसवणूक

पंधरा लाखांचा फ्रॉड

शहरातील पवन बळिराम सोनवणे या गृहस्थाला अशीच गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याच्याकडून वेळोवेळी १५ लाख ३३ हजार रुपये गंडविण्यात आले होते. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. डी. जगताप, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले अशांचे तपास पथकाने एकाला जम्मू-काश्मीरमधून ताब्यात घेतले.

दुसरा मुंबईत दबा धरून असल्याचे कळताच सायबर पथकाने राकेश मिश्रा याला मुंबईतून अटक केली असून, त्याच्या ताब्यातून १५० चेकबुक, १७८ सिमकार्ड, १६० एटीएम कार्ड, इंटरनेट राऊटर, लॅपटॉप, संगणक, दहा मोबाईल, प्रिंटर असा ऐवज जप्त केला. सायबर पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार करून ऑनलाइन लुटीपैकी १२ लाख रुपयांची रक्कम बँकेमार्फत सिझ केल्याची माहिती देण्यात आली आहे.

देशपातळीवर सिंडिकेट

सायबर गुन्हेगारांनी आता ऑनलाइन लुटीसाठी वेगवेगळ्या राज्यात कार्यरत सायबर गुन्हेगारांचे एक ऑनलाइन सिंडिकेट तयार केले आहे. एक काश्मीरमध्ये, दुसरा राजस्थान, तिसरा मुंबई, चौथा इतर कुठेतरी बसलेला असतो. एकाच ग्राहकाला वेगेवगळ्या पद्धतीने हे भामटे लूटत असतात. कुठल्याही प्रकारची ऑनलाइन गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

 1 arrested from Mumbai including Kashmir in cyber crime jalgaon news
Nashik Cyber Crime: वर्क फॉर्म होमच्या आमिषाने एकाला 16 लाखांचा गंडा; नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.