Jalgaon News : सर्वच प्रवर्गात तृतीय पंथीयांना मिळावे 1 टक्का आरक्षण

Indefinite hunger strike in front of the collector office.
Indefinite hunger strike in front of the collector office.esakal
Updated on

Jalgaon News : राज्य सरकारने तृतीय पंथींयाना सर्वच प्रवर्गात नोकरीसाठी एक टक्का आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून (ता. ३०) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे बेमुदत उपोषणास सुरुवात झाली.

समितीच्या अध्यक्षा शमिभा पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदेालन सुरू करण्यात आले आहे. (1 percent reservation should be given to third gender in all categories jalgaon news)

आंदोलनावेळी ‘महाराष्ट्र सरकार भानावर या भानावर या...', नोकरी नाहीतर भीक द्या, भीक द्या..’, ‘कोण म्हणतेय देत नाही...अरे घेतल्याशिवाय राहणार नाही’ आदी घोषणा तृतीय पंथीयांनी देत परिसर दणाणून सोडला होता.

सर्वच प्रवर्गात तृतीय पंथीय असतात. त्यामुळे सर्वच प्रवर्गात एक टक्का आरक्षण तृतीय पंथीयांना मिळावे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत आदेश दिले आहेत. आम्हांला स्वतंत्र आरक्षण नको. मात्र आहे, त्या सर्व संवर्गात एक टक्का आरक्षण मिळाले पाहिजे.

Indefinite hunger strike in front of the collector office.
Jalgaon News : ‘त्या’ महिला पोलिसाची दादागिरी नडली; गुन्हा दाखलनंतर पोलीस अधीक्षकांकडून निलंबन

या मागणीसाठी आत्तापर्यंत दोनवेळा आम्ही मंत्रालयासमोर उपोषण केले आहे. मात्र आम्हांला केवळ आश्‍वासने मिळाली आहेत. आम्ही अल्पसंख्याक आहोत, राजकीय पाठबळ आमच्याकडे नाही म्हणून राज्य सरकार आमच्यावर अन्याय करत असल्याची आमची भावना आहे.

आता आम्हांला आरक्षणाचा सरकारी निर्णय हवा आहे. त्याशिवाय उपोषणातून माघार नसल्याचे अध्यक्षा पाटील यांनी सांगितले.

Indefinite hunger strike in front of the collector office.
Jalgaon News : चोपड्यातील शिक्षक ठरला देवदूत! सर्पदंश झालेल्या आदिवासी मुलीचे वाचविले प्राण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.