Jalgaon News : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटी मंजूर

Jalgaon Municipal Corporation News
Jalgaon Municipal Corporation Newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केला.

अमृत योजना व भुयारी गटारी यासारख्या महत्त्वाच्या योजनामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आमदार सुरेश भोळे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. (10 crore sanctioned for major road works in city Jalgaon News)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Jalgaon Municipal Corporation News
Jalgaon News | ठाकरे सेनेचे आंदोलन बेगडी, दिशाभूल करणारे: डॉ. राधेश्‍याम चौधरी

गेल्या दोन महिन्यांत आमदार भोळे यांनी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल ३० ते ३५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला, असा दावा भाजपचे महापालिकेतील उपगट नेते राजेंद्र घुगे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.आताही शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. यात शहरातील दहा रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

दहा कोटी रुपयांतून शहरातील होणार असलेली कामे

प्रभाग ११ अंतर्गत नेहरूनगर गट क्रमांक १४६ मधील दीपक सोनवणे यांच्या घरापासून वाघनगर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग १३ अंतर्गत महाबळ चौक ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग ९ अंतर्गत गणपती मंदिर, शिक्षक कॉलनी, परमार्थ निकेतन ते शिंदेनगर आव्हाने रस्त्यापर्यंत, आर. एल. कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग ९ अंतर्गत मानवसेवा शाळेपासून ते अष्टभुजा गेट शिवरस्ता १२ मीटर रस्ता डांबरीकरण, प्रभाग १६ अंतर्गत राठी शाळेपासून ते सिंधी कॉलनी टी पॉईंटपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग ६ अंतर्गत पंचमुखी हनुमान मंदिरापासून ते नानीबाई हॉस्पिटलर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग ७ अंतर्गत आशाबाबा नगरमधील माऊलीनगर येथील रस्ता डांबरीकरण, प्रभाग १२ अंतर्गत मायादेवी नगरपासून ते रोटरी हॉल श्री. चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण.

Jalgaon Municipal Corporation News
Jalgaon News | ठाकरे सेनेचे आंदोलन बेगडी, दिशाभूल करणारे: डॉ. राधेश्‍याम चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.