पाचोरा : पाचोरा - भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिंदाड व कजगाव या दोन गावांना प्रत्येकी दहा कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असून, आमदार किशोर पाटील यांनी यासाठी गेल्या वर्षभरापासून केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे ग्रामस्थ आनंदले आहेत.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने व आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने शिंदाड व कजगाव या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी दहा कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. (10 crore water supply scheme approved in Shindad Kajgaon Jalgaon news)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील २६ गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी ५२८ कोटी ५४ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, यातील १६ गावांच्या ३४८ कोटी ६२ लाख खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील २८७ कोटी ६७ लाख खर्चाच्या १२ योजनांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनुसार शिंदाड व कजगावला पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्याने तेथील ग्रामस्थांना मोठा दिलासा व दिवाळी भेट मिळाली आहे.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी, यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीचा धडाका गुलाबराव पाटील यांनी सुरू केला आहे. आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनुसार मंत्रालयात गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली.
त्यात दोन गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील लहान मोठ्या गावांचे जास्तीत जास्त प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. दरम्यान, या पाणीपुरवठा कामांच्या अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी, पाण्याची टाकी आदी कामे केली जाणार आहेत.
"मतदारसंघातील ज्या गावांना पाणीपुरवठ्याच्या योजना नाहीत, अशा सर्व गावांना पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी आपण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत प्रयत्न केले असून, काही गावांची निविदा प्रक्रिया झाली असून. काही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत."
- किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.