Jalgaon Crime News : गोजरे येथील मालती चौधरी पुण्याला गेलेले असता चोरट्याने त्यांच्या घरात घरफोडी करून सहा लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केली होती. याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली असून एक संशयित विधिसंघर्ष असून संशयितांकडून दहा लाख ९४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांना २२ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक एस. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. गोजरे येथील मालतीबाई अभिमान चौधरी पुणे येथे गेल्या होत्या. (10 lakh 94 thousand worth of goods seized from thief jalgaon crime news )
चोरट्यांनी ही संधी साधत घरातून सहा लाख १३ हजार ६०० रुपये चे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, हेड कॉन्स्टेबल संजय तायडे,शेख, दीपक जाधव,प्रेमचंद सपकाळे, धीरज मंडलिक, सादिक शेख, राजू काझी, उमाकांत पाटील, जगदीश भोई,प्रशांत चव्हाण या बाजारपेठ तालुका पोलीस स्टेशन या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले होते.
संशयितांचा शोध घेण्यात येत होता. यामध्ये तांत्रिक व मिळालेल्या माहितीवरून व सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे दुचाकीने संशयितरित्या फिरत असताना दिसले, त्यांना ताब्यात घेतले असता घरफोडीतील संशयित असल्याचे निष्पन्न झाले. यात जळगाव येथील तांबापुरा येथील रवी प्रकाश चव्हाण (१८), जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा (२२) एक अल्पवयीन सतरा वर्षाचा यांना ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रवी चव्हाण यांच्याविरुद्ध जळगाव येथे गुन्हे दाखल आहेत. संशयित रवी यांने दिलेल्या माहितीनुसार चोरलेले सोने हे गुजरातमधील बारडोली येथे सोनार कन्हैयालाल मनीलाल सोनी (४३) याला विकले होते. पोलिसांनी तेथे जात १५४ ग्रॅम सोने (सहा लाख ४० हजार रुपये) सोनारा कडून जप्त केले.
संशयिताने सोनाराकडून मिळालेले पैसे हे स्वतःजवळ चाळीस हजार रुपये ठेऊन साथीदार जुनेद याला एक लाख रुपये, संशयित अल्पवयीनाला दोन लाख रुपये सोने विक्री कामी मदत करणाऱ्या साथीदार गुरूदयाल मंनजितसिंग टाक याला एक लाख रुपये वाटप केले होते. अन्सार शहर रुबाब शहा याला अटक केली आहे
यात आतापर्यंत एक लाख ९२ हजार पाचशे रुपये रोख, १९५ ग्रॅम सोन्यापैकी १५४ वजनाचे सोने, २७० ग्रॅम चांदीचे दागिने, दोन दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण दहा लाख ९४ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चारही संशयितांना न्यायालयात सादर केले असता २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयित अल्पवयीनला बाल न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.