MGNREGA : 10 हजारांवर मजुरांच्या हाताला काम! मजुरांची संख्या वाढली

The work in progress of preparing the absorption pit and Orchard plantation work going on under employment guarantee scheme
The work in progress of preparing the absorption pit and Orchard plantation work going on under employment guarantee scheme esakal
Updated on

Jalgaon News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या दहा हजारांवर मजूर काम करीत आहेत. मजुरांच्या संख्या मागील महिन्यात चार हजारांपर्यंत होती. ती या महिन्यात दहा हजारांवर झाली आहे. (10 thousand laborers are currently working in district under MGNREGA jalgaon news)

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना काम मिळणे दुरापास्त होते. यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा यक्षप्रश्न मजुरांसमोर उभा राहतो. अशा परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध होत ही योजना आधारवड ठरली आहे, हे विशेष.

सध्या या योजनेवर २०९८ कामे सुरू आहेत. त्यात फळबाग, गोठा शेड, विहीर, वैयक्तिक व सार्वजनिक वृक्षलागवड, शोषखड्डा, पेव्हर ब्लॉक बसविणे, नाडेप कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट व इतर, असे कामे सध्या सुरू आहेत.

या कामांवर १० हजार ४४९ मजूर काम करीत आहेत. या मजुरांना मजुरी ही वेळेवर देण्यात येत आहे.

तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती

*अमळनेर--१०८७

*भडगाव--१९९

*भुसावळ-- ४२४

*बोदवड--१८१

*चाळीसगाव--१२५०

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The work in progress of preparing the absorption pit and Orchard plantation work going on under employment guarantee scheme
Jalgaon News : दोन्ही बाळ मूळ मातांच्या कुशीत विसावली!

*चोपडा--४८

*धरणगाव--४३२

*एरंडोल--१९९

*जळगाव--४२०

जामनेर--१५९७

मुक्ताईनगर--७३

पाचोरा--६४८

पारोळा-- २७१९

रावेर-- ९४२

यावल-- २३१

एकूण-- १० हजार ४४९

"जळगाव जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोचले असताना, ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळतोय. मागील वर्षी २५६ रुपये मजुरीचा दर होता, तो शासनाने आता २७३ रुपये केला आहे. यामुळे या योजनेंतर्गत मजुरांची संख्या वाढली आहे." -रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना

The work in progress of preparing the absorption pit and Orchard plantation work going on under employment guarantee scheme
Jalgaon Municipal Corporation : रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी ‘ना हरकत’ देण्याचा प्रस्ताव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.