मुलींच्या विवाहासाठी 10 हजारांची मदत; सामूहिक-नोंदणीकृत विवाह योजना

Registered Marriage
Registered Marriageesakal
Updated on

जळगाव : सामूहिक/नोंदणीकृत विवाह (Registered marriage) करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे दहा हजारांचे अनुदान देण्यात येते. सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते. याचा शेतकरी, शेतमजुरांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वनिता सोनगत यांनी केले आहे. (10 thousand rupees help for marriage of girls Collectively registered marriage plans Jalgaon News)

या योजनेसाठी ‘वधू’ जळगाव जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी, शेतकरी असल्यास ७/१२ चा उतारा व शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असू नये, त्यासाठी उत्पनाचा दाखला असावा. या कार्यालयाकडून सदर योजनेचा लाभ खुला व इतर मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी देण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत असल्याने अनुदान मिळण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाहीत.

Registered Marriage
नाशिक : शहर परिसरातून 3 दुचाकी चोरी

या आहेत पात्रता

सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करणारे जोडपे, बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग न केल्याबाबतचे विहित नमुन्यात वीस रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र, सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. नोंदणीकृत एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान ५ व कमाल १०० जोडप्याचा समावेश करण्याची परवानगी राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, ०२५७-२२२८८२८ संपर्क करावा.

Registered Marriage
Crime : देवीचा मळा भागात जमावाने जाळल्या 2 दुचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.